उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे : एसपी राकेश ओला. 'स्नेहबंध'तर्फे पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण.
पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण करताना पोलिस अधीक्षक राकेश ओला, स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे समवेत पोलिस उपअधीक्षक (गृह) हरीश खेडकर, उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आदी. नगर (प्रतिनिधी):- सर्वत्र पर्यावरणाची हानी होणे सुरु आहे. त्यामुळे तापमान वाढतच आहे. मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे झाले आहे. वृक्ष असतील तरच मानवजाती वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बनवून ठेवा असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात मंगळवारी पोलिस अधीक्षक ओला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (गृह) हरीश खेडकर, उपअधीक्षक अमोल भारती, राखीव पोलिस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, सहायक फौजदार मुसा, सहायक फौजदार अन्वर सय्यद आदी उपस्थित होते. ओला म्हणाले, दिवसेंदिव