पोस्ट्स

कामरगाव सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न.

इमेज
अहिल्यानगर /प्रतिनिधी : कामरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, कामरगाव ता. जि. अहिल्यानगर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेच्या कार्यालया समोर हनुमान मंदिर सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी अध्यक्ष पदी चेअरमन सुदाम ठोकळ यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सचिव अनिल भोर यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व कायम करण्यात आले. सन २०२५-२०२६ या वर्षाचा जमाखर्च, ताळेबंद, नफा-तोटा व व्यापारी पत्रकांवर इ बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. तसेच सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे, उत्पन्न-खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे, ऑडिट मेमोचे वाचन करणे इ बाबींवर चर्चा करण्यात आली. ऐनवेळी उपस्थित झालेल्या विषयांवर मा.सरपंच तुकाराम कातोरे यांनी सभासदांना दरवर्षी भरावे लागणारे शेअर्स व व्याजाविषयीच्या मुद्दयावर तसेच संस्थेच्या नुतन इमारतीविषय सभेत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी संस्थेचे  चेअरमन सुदाम ठोकळ,व्हा.चेअरमन भिमाबाई आंधळ...

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर ला बंदी- आदेशाचा भंग केल्यास कडक कारवाई ; आपल्या भारतीय संस्कृतीतील पारंपारिक वाद्याचा वापर करावा-जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन.

इमेज
  अहिल्यानगर/प्रतिनिधी - जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणासह  नियमांचे पालन करावे. प्लाझ्मा-लेझरचा वापर करू नये तसेच मोठ्या आवाजातील डीजे न वाजवता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करून ध्वनी प्रदूषण केल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा  इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला. Adv  अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाचे स्वागत करताना अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत तसेच कमी आवाजातील साऊंड सिस्टीमचा वापर करीत  पोलिसांना सहकार्य केले. आता गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली असून, गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजे, प्लाझ्मा-लेझर आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, मंडळांचे प्रमुख तसेच डीजे चालक व मालक या...

जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची भोरवाडी ग्रामस्थांची मागणी. सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे यांचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन.

इमेज
अहिल्यानगर /प्रतिनिधी: नगर तालुक्यातील मौजे भोरवाडी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी तातडीने चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे तसेच प्रगतशील शेतकरी प्रदीप वाघ व बापूसाहेब वायळ यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देत केली आहे. यावेळी कामरगाव येथे आयुक्तांनी दिलेल्या भेटीवेळी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर तहसिलदार ढवळे,नायब तहसिलदार अभिजित वांढेकर महसूल कर्मचारी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.  Adv  याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भोरवाडी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालकांकडे शेती व पशुपालन हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असून, सध्या जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम ह...

जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची भोरवाडी ग्रामस्थांची मागणी. सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे यांचे तहसीलदारांना निवेदन.

इमेज
अहिल्यानगर /प्रतिनिधी: नगर तालुक्यातील मौजे भोरवाडी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी तातडीने चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे तसेच प्रगतशील शेतकरी प्रदीप वाघ व बापूसाहेब वायळ यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देत केली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर तहसिलदार ढवळे,नायब तहसिलदार अभिजित वांढेकर उपस्थित होते.  Adv  याबाबत तहसीलदार  नगर यांच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भोरवाडी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालकांकडे शेती व पशुपालन हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असून, सध्या जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जनावरांना चारा उपलब्ध...

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांचा कौतुकास्पद उपक्रम. सामाजिक बांधिलकी जपत कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी) : तालुक्यातील कामरगाव येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. ADV विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पुष्पाताई सोनवणे यांच्या या उपक्रमातून ‘शिक्षण हीच खरी सेवा’ हा संदेश अधोरेखित झाला. सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची जाणीव ठेवून दरवर्षी आई-वडिलांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची त्यांची परंपरा कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी शिक्षिका सविता तवले व बेबीसरोजा ढेले, बबीता आंधळे, शीला गुगळे, शशिकला भुजबळ, पदमा सांगळे, मीना आभाने, नंदा चौरे, रंजना चौधरी, युवा नेते शिवा सोनवणे व पत्रकार हेमंत साठे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणव...

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक - श्री.अरविंद पारगावकर

इमेज
  अहिल्यानगर/ प्रतिनिधी:- स्वातंत्र्यानंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली  असून्  आपला देश सुपरपॉवर होण्यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष श्री.अरविंद पारगावकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदानामुळे शक्य झाले असून विद्यार्थ्यांनी  त्यांच्या त्यागाची जाणीव ठेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. सर्वांशी संवाद साधताना अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी सी.एस.आर.फंडामधून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रगत संगणक देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.श्री.संदीप पालवे यांनी उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्स्सी. डाटा  सायन्स अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक शैक्षणिक सु...

कामरगावातील वाढत्या चोऱ्यांबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन; ८ दिवसांत उलगडा न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा.

इमेज
अहिल्यानगर(हेमंत साठे) दि. १८ जुलै :-              मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजे कामरगाव येथे सलग घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १७ जुलैच्या मध्यरात्री ग्रामदैवत श्री कामाक्षा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवीचे अंदाजे अडीच ते तीन तोळे सोन्याचे दागिने व मुकुट चोरी करून मंदिराची विटंबना केली. त्याच रात्री गावातील आणखी दोन ठिकाणी घरफोडी झाली. त्यानंतर दि. १८ जुलैच्या मध्यरात्री पुन्हा शेळ्या व जनावरांची चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या सर्व घटनांचे काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे , कामरगावचे युवा नेते दादा झरेकर, स्वप्नील ठोकळ, अक्षय कोल्हे, सुयोग भुजबळ, संदिप लष्करे व जय आंधळे यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्य...

फॉलोअर