कामरगावात चोऱ्यांचे सत्र सुरूच ! कामरगाव ग्रामस्थांसह शेतकरी भीतीच्या छायेत...

अहिल्यानगर( हेमंत साठे):- तालुक्यातील अहिल्यानगर-पुणे महामार्गालगत असणाऱ्या कामरगाव मधे ग्रामदैवत तथा प्रसिद्ध कामक्षा माता मंदिरात १७ जुलै रोजी रात्री झालेली धाडसी चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा १८ जुलै रोजी रात्री मंदिरापासून काही अंतरावर राहणारे शेतकरी आंधळे यांच्या घरी चोरी झाली आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी रात्री अंदाजे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास शेतकरी चांगदेव आंधळे यांच्या अंदाजे किंमत ३००००/- रु  किंमतीच्या दोन शेळया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असल्याचे चांगदेव आंधळे यांनी सांगितले.

          महाराष्ट्रातील कामक्षा देवीचे एकमेव प्रसिद्ध देवस्थान कामक्षा माता मंदिरातील धाडसी चोरीची घटना ताजी असतानाच मंदिरापासून काही अंतरावर राहणाऱ्या शेतकऱ्याच्या कडे चोरी झाल्याने ग्रामस्थांमधे प्रचंड दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

         तसेच काही शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी ठोकळ नामक शेतकऱ्याचे वासरू चोरीचा प्रयत्न झाला होता परंतु शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे व वासराचा आवाज आल्याने शेतकऱ्याने चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच भुजबळ नामक महिला शेतकऱ्याची देखील अंदाजे वीस हजार रु किमतीची शेळी चोरीला जाण्याची घटना घडली असून वारंवार व सलग होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कामरगावातील ग्रामस्थ तसेच आसपास राहणारे शेतकरी देखील भीतीच्या छायेत आहेत.

ग्रामस्थांची मागणी:- 

      गावात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थ दहशतीत व भीतीच्या छायेत आहेत. पोलीसांनी गावात देखील रात्रीची गस्त घालावी. तसेच गावात होणाऱ्या सलग चोऱ्यांचा तात्काळ छ्डा लावून दोषींना गजाआड करत कडक कायदेशीर कारवाई करावी व भीतीच्या छायेत असणाऱ्या ग्रामस्थ व शेतकरी वर्गाला दिलासा दयावा. अशी मागणी गावातील तरुण व ग्रामस्थांनी करत आहेत.

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .