कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : 

कामरगाव ता. अहिल्यानगर परिसरात एका बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने चोरून लंपास केल्याची घटना घडली आहे.

 सदर चोरीच्या घटनेत खरेदी करतेवेळेची अंदाजे किंमत रु ८६०००/-  परंतु सदयस्थितीतील मार्केट भावाप्रमाणे अंदाजे किंमत ६०००००/ (सहा लाख रुपये) किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे असे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

याबाबत फिर्यादी प्राध्यापक डॉ.अशोक विठ्ठल ठोकळ (वय ४९, रा. मुलानवस्ती, कामरगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की. कामरगाव येथील प्राध्यापक डॉ. अशोक ठोकळ एका नामांकित महाविदयालयात कार्यरत आहेत. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रात सण झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी दागिने घरातील कपाटाखाली ठेवले होते. परंतु १० फेब्रुवारी रोजी घरात झाडलोट करताना दागिने नसल्याचे आढळले. त्यांनी डॉ.अशोक ठोकळ यांना फोनद्वारे सदर घटना कळवली. त्यानंतर त्यानी घरात सर्वत्र शोधाशोध करून देखील दागिने मिळून आले नाही. 

        यानंतर पोलीसांत दिलेल्या तक्रारी नुसार १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाखालील ब्लाऊजमध्ये स्टीलच्या डब्यात जपून ठेवलेले दागिने चोरट्याने लंपास केले. यामध्ये सोन्याचे मणी मंगळसूत्र, अर्धा तोळा वजनाची नथ, दोन अंगठ्या, सोन्याचे वेल, कानातील टॉप्स, कर्णफुले आणि सोन्याचे पॅडल अशा अंदाजे एकूण रू ८६०००/- ( खरेदी वेळीची किंमत) परंतु चोरी गेलेल्या दागिन्यांची सध्याची मार्केट भावाप्रमाणे अंदाजे किमत ६०००००/- (सहा लाख) रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.  शोध घेऊनही दागिने मिळून न आल्याने अखेर प्राध्यापक डॉ अशोक ठोकळ यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्ह्याचा तपास अंमलदार डावखर करीत आहेत असे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

*********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.