शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक - श्री.अरविंद पारगावकर
अहिल्यानगर/ प्रतिनिधी:- स्वातंत्र्यानंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असून् आपला देश सुपरपॉवर होण्यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष श्री.अरविंद पारगावकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदानामुळे शक्य झाले असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यागाची जाणीव ठेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. सर्वांशी संवाद साधताना अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी सी.एस.आर.फंडामधून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रगत संगणक देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.श्री.संदीप पालवे यांनी उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्स्सी. डाटा सायन्स अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक शैक्षणिक सु...