शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक - श्री.अरविंद पारगावकर

 



अहिल्यानगर/ प्रतिनिधी:- स्वातंत्र्यानंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली  असून्  आपला देश सुपरपॉवर होण्यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष श्री.अरविंद पारगावकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदानामुळे शक्य झाले असून विद्यार्थ्यांनी  त्यांच्या त्यागाची जाणीव ठेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. सर्वांशी संवाद साधताना अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी सी.एस.आर.फंडामधून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रगत संगणक देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.श्री.संदीप पालवे यांनी उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्स्सी. डाटा  सायन्स अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आवर्जून उल्लेख केला. प्रस्तुत विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य श्री.अमोल घोलप यांनी विद्यार्थ्यांनी रील स्टार न बनता रोल मॉडेल बनावे असा संदेश आपल्या भाषणातून दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक कुलसचिव डॉ.शिवप्रसाद घालमे यांनी आजपर्यंतचा उपकेंद्र अहिल्यानगरचा प्रवास विषद करून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.राजेंद्र विखे - पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुरु झालेल्या बी.एस्सी. डाटा  सायन्स अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सर्व योजनांचा लाभ मिळत असून डॉ.राजेंद्र विखे- पाटील   यांनी जिल्हा नियोजनकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने विद्यार्थ्यांना प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कुल बस मान्य झाल्याचे सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास बी.एस्सी. डाटा  सायन्स अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी, कार्यरत सर्व स्टाफ,प्रशासकीय् कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ.बी.के.थोरवे यांनी आभार मानले.भारत मातेच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .