कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .


अहिल्यानगर( प्रतिनिधी):- तालुक्यातील गुन्हेगारीला चाप लावण्याकरिता नव्याने रूजू झालेले नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे व त्यांच्या टीमने कारवाईचा धडाका लावल्याचे दिसून येत असून, नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दि.२१/०२/२०२६ रोजी कोथरुळ, ता. माजलगाव जि. बीड येथुन इसम नामे-बालासाहेब काशीनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम असे स्वीफ्ट कार नं- MH १२ UM २२४८  या कारने पुणे येथे त्यांचे भावास भेटण्यासाठी जात असताना दि-२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.३० मि. सुमारास  ते कामरगाव शिवारातील हाँटेल गुरुदत्त हाँटेलचे जवळ गाडी रोडचे बाजूला घेवुन थांबले असता. तेथे चार अनोळखी इसमांनी हातात कोयते घेवून येत फिर्यादी व साक्षीदार यांच्या गळ्याला लावले. व फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना त्यांचे स्विफ्ट गाडीमध्ये बसवून फिर्यादी व साक्षीदार  यांना नगरकडे नेत असताना स्विफ्ट कार व लक्झरीचा अपघात झाला. सदर आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे १८,०००/- रुपये रोख, ५०००० रुपये ऑनलाईन व ४७,००० हजार रुपये किमतीचे मोबाईल, चार्जर, जर्किंग असा एकुण १,१५,००००/- रुपयांचा मुद्देमाल शस्त्रांचा धाक दाखवुन, मारहाण करुन बळजबरीने चोरुन नेला. त्या अनुशंगाने नगर तालुका पोलीस स्टेशन गुरनं- ११४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४),३०९ (६), ३ (५) प्रमाणे दि-२३/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून 


सदर घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीतांबाबत माहिती घेत असताना नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी मिळालेल्या माहितीनुसार तसेच पोलीस स्टाफने केलेल्या तांत्रीक तपासाद्वारे सदरचा गुन्हा हा तुषार विजय उमाप, रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर जि. अहिल्यानगर याने त्याचे साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाली. सदर आरोपीताचा शोध घेत असताना आरोपी नामे-१) तुषार विजय उमाप हा त्याचे साथीदार नामे- २) बुद्धभुषण संतोष आंग्रे, दोघे रा.दैठणे गुंजाळ ता. पारनेर जि. अहिल्यानगर ३) तेजस लक्ष्मण उगलमुगले, रा. मनोरमा कॉलनी, नवनागापुर ता.जि.अहिल्यानगर हे दैठणे गुंजाळ ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथे मिळून आले. सदर आरोपींकडे त्यांचे चौथ्या साथीदाराबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याचे नाव ४) भो-या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (फरार) रा. गांधीनगर, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीतांना गुन्ह्यात अटक केली असुन आरोपी व साक्षीदार यांचेकडुन गुन्ह्यात गेले मालापैकी ५०००/- रुपये रोख रक्कम, ५००००/-ऑनलाईन ट्रान्सपर केलेले, ३२,०००/- रु.किंमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल, १०००/- रुये किं.चे वनप्लस कंपनीचे चार्जर, १०००/- रु. किं.चे जर्कीन तसेच आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांपैकी ६००/- रुपये किं.चे एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी कोयता असा एकुण ८९,६००/- रुपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच सदर प्रकारचे गुन्हे यापुर्वी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले असुन आरोपीतांना मागील  २ महिन्यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांबाबत विचारणा केली असता आरोपीतांनी कबुली दिली की, यापुर्वी २ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी चास घाटामध्ये एका कुटुंबाची गाडी बंद पडलेली असताना त्यांना मारहाण करुन दागिने, रोख रक्कम, कागदपत्रे बळजबरीने चोरुन नेल्याचे सांगितले. तसेच आरोपी नामे- तुषार याने व त्याचा साथीदीर भो-या उर्फ विठ्ल काळे (फरार) याने चास शिवारात पेट्रोल पंप हाँटेल जवळ मध्यरात्री तीन इसमांना गजाचा धाक दाखवुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन ,मोबाईल बळजबरीने चोरुन नेल्याचे सांगितले. तरी पोलीस स्टेशनला सदर हकिकतीच्या अनुशंगाने पोलीसांनी गुन्ह्यांची पडताळणी केली असता वरील घटनांच्या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत असे आढळून आले असून पुढील कारवाई पोलीस करत असल्याचे समजते.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.