कामरगाव ग्रामपंचायत कडून दहावी गुणवंतांचा सत्कार. पदाधिकारी व ग्रामस्थांकडून विदयार्थ्याचे अभिनंदन व शुभेच्छा.
जाहिरात:-.👇🏻
************************************
अहिल्यानगर(हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगाव येथील भारत सर्व सेवा संघ संचलित कामरगाव इंग्लिश स्कुल कामरगाव या विदयालयाचा दहावीचा निकाल 94.73% लागला. या निकालाच्या अनुषंगाने दहावी गुणवंतांच्या सत्कार समारोहाचे आयोजन कामरगाव ग्रामपंचायकडून दि 19 मे रोजी हनुमान मंदिर सभागृह कातोरेवाडी या ठिकाणी करण्यात आले होते.
यावेळी गुणवंतापैकी प्रथम कु. धनश्री बाळासाहेब ठोकळ -92.60%, हर्षदा अविनाश आंधळे- 86.80%, तृतीय समृद्धी अंकुश ठोकळ-86.40% चतुर्थ चि किशोर विजय ठोकळ-84.80%, पाचवा सुयश घनश्याम कातोरे- 79.20% असे गुणानुक्रमे 5 विदयार्थ्याचा कामरगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून फेटा बांधून तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे शिक्षक व पालकांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी सचिन राठोड, ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे, मा.आरोग्य अधिकारी बापूसाहेब शेळके, उदयोजक गणेश ठोकळ, प्रदिप साठे, A to z स्टोअरचे संचालक वैभव ठोकळ, माजी सैनिक राजेंद्र शिंदे, रायचंद ठोकळ,संदिप गुंजाळ, अशोक कातोरे, योगेश ठोकळ, सुलतान शेख, संजय ठोकळ, आदम शेख,रावजी ठोकळ, दत्तू ठोकळ,नाना ठोकळ,शंकर ठोकळ, आनंदा ठोकळ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष साठे, फैयाज शेख, संदिप पाडेकर, गणेश खाडे यांसोबत ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv
.jpg)






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा