पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निष्ठा व शौर्याचा गौरव : अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा ‘स्नेहबंध’कडून सत्कार.

इमेज
  अहिल्यानगर(हेमंत साठे): –  महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या निमित्ताने स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी कलुबर्मे यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. सन २०२५ या वर्षासाठी मिळालेल्या या प्रतिष्ठित सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून, जिल्ह्याच्या कार्यक्षमतेची राज्य स्तरावर दखल घेतली गेली आहे. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आपल्या कार्यकाळात निष्ठा, प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अभिनंदन केले. "अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी निष्ठा, धैर्य आणि उत्कृष्ट सेवेमुळे हा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या कार्याचा राज्य स्तरावर झालेला गौरव हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.” – 'स्नेहबंध' फौंडेशन संस्था...

दहिगावात शेतकऱ्याचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी. तरूण सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाची आग विझवण्यात मोलाची भूमिका.

इमेज
अहिल्यानगर प्रतिनिधी:- तालुक्यातील दहिगाव श्रीरामांचे या ठिकाणी दि ७ मे रोजी भर दुपारी मारुती नेटके हे आपल्या  कुटुंबासह शेतात शेतकाम करत असताना घराला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धुर व आवाज येऊ लागल्याने गावातील तरुणांनी धूराच्या दिशेने धाव घेतली त्यांवेळी तरुणांनी मारुती नेटके यांच्या घराला आग लागल्याचे लक्षात आले. सदर आग लागल्याची खबर नेटके कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली. परंतु तो पर्यंत आगी संपूर्ण घरात पसरली होती चोहोबाजूंनी आगीने वेढा टाकला होता. घरात गॅस सिलिंडर टाकी असल्याने आग विझवण्यासाठी मोठ्या धाडसाच काम होत. या वेळी गावातील राधाकिसन कासार, रविराज पोटरे, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, संजय शिंदे, अभिमन्यु नेटके, शाम जाधव यांनी मिळून युक्तीने जाळं चालू असताना गॅस टाकी बाहेर काढण्याचे काम केले. आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने अहिल्यानगर महानगरपालिका  अग्निशमन दलाचे वाहन काही मिनिटांत दहिगाव येथे पोहचल. परंतु दहिगावातील अतिक्रमणामुळ अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळ...

फॉलोअर