कोतवाली पोलीस स्टेशनच्या विशाल दळवी यांना उत्कृष्ट तपासासाठी प्रशस्तीपत्र.

अहिल्यानगर(प्रतिनिधी) : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील खुनाच्या क्लिष्ट आणि आव्हानात्मक गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल अशोक दळवी यांना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. २२२/२०२६, बीएनएस कलम १०३(१), २३८ (३)(५) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना मिसिंग व्यक्ती प्रसाद रोहिदास जाधव यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. आरोपींनी वाकोडी शिवारातील उसाच्या शेतात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून करून मृतदेह टाकून दिला होता.

या प्रकरणात गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत विशाल दळवी यांनी आरोपींचा शोध घेतला. आरोपी शुभम हरि भोसले (वय २०, रा. वाकोडीफाटा) आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे (वय ४२, रा. बुरुडगाव) यांना अटक करून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.

विशाल दळवी यांनी केलेली कामगिरी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करत, भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावावी, अशा शुभेच्छा प्रशस्तीपत्रातून देण्यात आल्या.

हे प्रशस्तीपत्र अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.) यांच्या हस्ते शहर उपअधिक्षक दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .