दहिगावात शेतकऱ्याचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी. तरूण सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाची आग विझवण्यात मोलाची भूमिका.

अहिल्यानगर प्रतिनिधी:- तालुक्यातील दहिगाव श्रीरामांचे या ठिकाणी दि ७ मे रोजी भर दुपारी मारुती नेटके हे आपल्या  कुटुंबासह शेतात शेतकाम करत असताना घराला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धुर व आवाज येऊ लागल्याने गावातील तरुणांनी धूराच्या दिशेने धाव घेतली त्यांवेळी तरुणांनी मारुती नेटके यांच्या घराला आग लागल्याचे लक्षात आले. सदर आग लागल्याची खबर नेटके कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली.

परंतु तो पर्यंत आगी संपूर्ण घरात पसरली होती चोहोबाजूंनी आगीने वेढा टाकला होता. घरात गॅस सिलिंडर टाकी असल्याने आग विझवण्यासाठी मोठ्या धाडसाच काम होत. या वेळी गावातील राधाकिसन कासार, रविराज पोटरे, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, संजय शिंदे, अभिमन्यु नेटके, शाम जाधव यांनी मिळून युक्तीने जाळं चालू असताना गॅस टाकी बाहेर काढण्याचे काम केले. आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने अहिल्यानगर महानगरपालिका  अग्निशमन दलाचे वाहन काही मिनिटांत दहिगाव येथे पोहचल. परंतु दहिगावातील अतिक्रमणामुळ अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या वेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आले. शेजारील घर आग आगीपासून  वाचले.या आगीत नेटके कुटुंबाच्या संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अशी माहिती मिळाली यामधे धान्य, शाळेतील मुलांचे शैक्षणिक साहित्य, इतर वस्तू भस्म झाल्याने मोठ आर्थिक नुकसान झाले आहे.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वाहन चालक शुभम गावडे,फायरमन मच्छिंद्र धोत्रे ,अक्षय घुले, विठ्ठल चितळकर  तसेच गावातील शाम जाधव, संजय शिंदे, राधाकिसन कासर, शिवा म्हस्के, रवीराज पोटरे,बंडु शिंदे, अंकुश जाधव, सुधीर म्हस्के, दत्तात्रय म्हस्के, मधुकर म्हस्के, आदी ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती मिळाली.

खेडे गावांत अतिक्रमणा मुळे आपत्कालीन प्रसंगी आपत्कालीन यंत्रणांची वाहने  जाण्या पुरते रस्ते असणं आवश्यक आहे. पंरंतु खेडेगावातील अतिक्रमणांची समस्या भीषणया घटनेव झाल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, Follow व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .