12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी बी.एस्सी. डाटा सायन्स हा उत्कृष्ट पर्याय : डॉ.दीपक हर्डीकर... पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात करियर मार्गदर्शनपर पालक- विद्यार्थी मेळावा सम्पन्न.
अहिल्यानगर(हेमंत साठे):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,उपकेंद्र अहिल्यानगर येथे दि.22 मे 2026 रोजी अहिल्यानगर उपकेंद्र,बाबुर्डी घुमट परिसरातील व अहिल्यानगर शहरातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एकदिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशन चे CEO डॉ. दीपक हर्डीकर यांनी विद्यार्थी व पालक यांना सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना करिअरसाठी बी.एस्स्सी.डाटा सायन्स हा उत्तम व योग्य अभ्यासक्रम असल्याचे सांगितले.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.संदीप पालवे यांनी उपकेंद्रातफे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधाबद्दल माहिती देऊन प्रवेश घेण्याचे आवाहन केले.
सहायक कुलसचिव डॉ.शिवप्रसाद घालमे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात अहिल्यानगर उपकेंद्राचा आजपर्यंतचा प्रवास विषद करून प्रस्तुत अभ्यासक्रम उपकेंद्रात सुरु करण्याची विद्यापीठाची भूमिका विषद केली. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.बी.के.थोरवे यांनी सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यातील नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निराकरण केले आभार प्रा.पी.एस.मेटकर यांनी मानले.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा