निष्ठा व शौर्याचा गौरव : अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा ‘स्नेहबंध’कडून सत्कार.
या निमित्ताने स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी कलुबर्मे यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
सन २०२५ या वर्षासाठी मिळालेल्या या प्रतिष्ठित सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून, जिल्ह्याच्या कार्यक्षमतेची राज्य स्तरावर दखल घेतली गेली आहे.
अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आपल्या कार्यकाळात निष्ठा, प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अभिनंदन केले.
"अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी निष्ठा, धैर्य आणि उत्कृष्ट सेवेमुळे हा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या कार्याचा राज्य स्तरावर झालेला गौरव हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
– 'स्नेहबंध' फौंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, Follow व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा