मनसे सुपा गट प्रमुखपदी प्रतीक शेळके यांची नियुक्ती. पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

सुपा (प्रतिनीधी) -   महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्या नगर जिल्हा संपर्क प्रमुख नयन कदम यांच्या सुचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते म्हसणे (सुलतानपूर) येथील प्रतीक शेळके यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुपा गट प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

जाहिरात...👇🏻

या नियुक्तीप्रसंगी पारनेर तालुका सचिव श्री नारायण नरवडे पारनेर तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, पारनेर शहर अध्यक्ष सतिश म्हस्के,सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी अजय पठारे, नितीन बागल यांच्यासह मनसेचे असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

नियुक्तीनंतर प्रतीक शेळके यांनी मनसे नेतृत्वाचे आभार मानत सुपा गटातील जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच नगर- पुणे रोडवरील वाहतूक कोंडी व सुपा येथे उड्डाणपुलाच्या प्रश्नासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करून महामार्ग मोकळा होईपर्यंत सातत्य पुर्ण लढा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना सोबत घेऊन सुरू ठेवण्याचा संकल्प तालुका अध्यक्ष पवार, आणि तालुका सचिव नारायण नरवडे यांनी व्यक्त केला.

"जनसेवा हीच खरी राजसेवा" या राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन सुपा भागात तालुका अध्यक्ष श्री अविनाश पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मनसेचा भगवा अधिक उंच नेण्याचा निर्धार नवनियुक्त गट प्रमुख प्रतीक शेळके यांनी व्यक्त केला.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर