छत्रपती अभियांत्रिकी 'च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
अहिल्यानगर(रफिक शेख): नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला विविध कार्य करू शकणारा मल्टी युटिलिटी रोबोट हा राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आकर्षण बनला. AISSMS IOIT College Pune येथे नुकत्याच झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत राज्यासह इतर राज्यातून विविध प्रोजेक्ट सादर करण्यात आले. सुमारे 250 प्रोजेक्ट्समधून छत्रपती अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी यात द्वितीय क्रमांक मिळवला. नवनाथ भिंगारदिवे, पार्थ साठे, आदित्य राऊत, तनुजा व्यवहारे अशी या विजेत्यांची नावे असून याच विद्यार्थ्यांनी या आधी
छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यायात झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रोजेक्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
जाहिरात...👇🏻
या मल्टी युटिलिटी रोबोटची वैशिष्टे म्हणजे मोबाईलवरून रोबोटला ऑपरेट करू शकतो. व्हॉईस अँड टेक्स्ट कंट्रोल, स्पीड कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, रेकॉर्ड अॅन्ड प्ले पाथ, मोबाईलवरून लाइव्ह कॅमेरा स्ट्रीमिंग, हॉर्न, पुढे जात असताना रोड वरील अडथळे सेन्स करून दूर करणे, रोबोट मध्ये बसवलेले गॅझेट हे काही मानवी हावभाव देखील देतात. लाइव्ह जीपीएस ट्रेकिंग, ऑटोनॉमस फिचर्स, इत्यादी विविध वैशिष्टे असणारा हा रोबोट हॉस्पिटल, हॉटेल्स, डिफेन्स, ऑफिसेस यांसारख्या ठिकाणी वापरता येऊ शकतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना या प्रोजेक्टसाठी सर्व विभाग प्रमुख डॉ. एम. के. भोसले, प्रा. प्रसाद मुटकुळे, प्रा. अक्षय देखणे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांच्या कौतूक करत या रोबोटमध्ये ए. आय. तंत्रज्ञानाचा देखील वापर करता येऊ शकतो आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये अजून काही नवीन गोष्टींचा समावेश करावा, असे मत व्यक्त केले.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा