शंभर टक्के जनगणना कार्य पूर्ण करणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान.
अहिल्यानगर(हेमंत साठे) :भारत सरकारच्या वतीने देशभर सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेला अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेग आला असून आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना २०२७ चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रत्येक प्रगणकाला ३० दिवसांचा कालावधी आणि निश्चित प्रभागनिहाय घरांची जबाबदारी देण्यात आलेली असताना काही कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीनच दिवसांत जनगणनेचे १०० टक्के काम अचूक पूर्ण करत नवीन आदर्श निर्माण केला आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात ४२ अंश तापमानातही अवघ्या तीन दिवसांत १०० टक्के जनगणनचे कामकाज पूर्ण करणाऱ्या बुरुडगाव झोनमधील प्रगणक व पर्यवेक्षक यांचा अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त मेहेर लहारे, उपायुक्त एस.बी.तडवी, अमोल कोतकर,ॠषीकेश सातपुते उपस्थित होते.
प्रभाग समिती क्रमांक चार बुरुडगाव चार्ज अधिकारी एस.बी.तडवी व पर्यवेक्षक अभिजीत जोशी व योगेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली घरयादी गट क्रमांक १८६ चे प्रगणक भाऊसाहेब कबाडी,सर्कल २७ मधील प्रगणक संजय शिंदे व भारती गुंड यांनी अवघ्या तीन दिवसांत जनगणनचे शंभर टक्के काम पूर्ण करत नवा आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल आयुक्तांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांचा विशेष सन्मान करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा