कामरगावातील कामक्षा माता मंदिरात धाडसी चोरी... महाराष्ट्रातील कामक्षा देवीचे एकमेव प्रसिद्ध देवस्थानातील चोरीचा छडा लावण्याचे पोलीसांसमोर आव्हान ?

 


अहिल्यानगर (हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगाव येथील महाराष्ट्रातील एकमेव कामक्षा देवीचे प्रसिद्ध देवस्थान कामक्षा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत अंदाजे अडीच ते तीन तोळयाचे दागिने व ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते.

      मिळालेल्या माहितीनुसार १७ जुलै  रात्री अंदाजे २ ते ३ च्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी कामरगाव येथील मध्यवस्तीत असणाऱ्या प्रसिद्ध कामक्षा माता मंदिरात अंदाजे अडीच ते तीन तोळे दागिन्याची व मुकुटाची चोरी केली. CCTV फुटेज नुसार मंदिरातील गाभाऱ्यातून देवीच्या मुर्तीवरील दागिने अक्षरशः ९ सेकंदात अत्यंत अमानुषपणे ओरबाडत चोरले. चोरटे हे चेहरा रुमालाने बांधून निळी जीन्स व शर्ट वर आले असल्याचे समजते.

        तसेच चोरट्यांनी मंदिराशेजारील  घरांच्या कडया लावल्या व स्टेट बँक अधिकारी सतीश सोनवणे व रज्जाक शेख यांच्या बंद घरात देखील उचका पाचक केल्याचे समजते.

         चोरीची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेत तपासकामी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आल्याचे समजते.

       महाराष्ट्रातील एकमेव कामक्षा देवीचे प्रसिद्ध देवस्थान व कामरगाव सह महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रदधास्थान असणाऱ्या कामक्षा माता मंदिरात झालेल्या धाडसी चोरीमुळे भाविकांमधे प्रचंड खळबळ उडाली असून पोलीसांनी सदर चोरीचा तात्काळ तपास लावून दोषींना गजाआड करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांमधून होत आहे.

       सदर चोरीच्या घटनेचा तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे समजते.

📌 प्रसिद्ध मंदिरात चोरी करत चोरांचे पोलीसांना आव्हान ?

     अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील प्रसिद्ध देवस्थान कामक्षा माता मंदिरात रात्रीची गस्त सुरू असताना देखील गावातील मध्यवस्तीत धाडसी चोरी करत नगर तालुका पोलीसांना आव्हान दिले असल्याची चर्चा परिसरात होत आहे...

 📌 या आधी देखील मंदिरात चोरी आणि चोरीचे प्रयत्न...

मिळालेल्या माहितीनुसार, या आधी देखील मंदिरात चोरी झाली असून त्याचा तपास अजूनही गुलदस्त्यात असल्याचे समजते. तसेच मागील काही महिन्यांपूर्वी देखील चोरीचे प्रयत्न झाले होते. परंतु आसपासच्या नागरीकांच्या सतर्कतेमुळे चोरीचे प्रयत्न हाणून पाडले.

📌 ट्रस्टचा वाद आणि बंद सुरक्षा उपकरणे...

मिळालेल्या माहितीनुसार कामक्षा माता मंदिर ट्रस्टचा गावातील दोन पक्षात वाद सुरू असल्याचे समजते. त्यामुळे मंदिरात सुरक्षा उपकरणे असून त्यांची देखभाल नसल्याने व सिक्युरिटी सेन्सर अलार्म बंद असल्या कारणाने चोरी झाली असल्याची चर्चा ग्रामस्थांमधे आहे.

📌 मंदिराच्या सुरक्षेशी तडजोड का ?...

कामक्षा देवीचे मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या प्रयत्नांमुळे मंदिर व्यवस्थानाने मंदिर परिसरात अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे बसवणे व त्या उपकरणाची वेळोवेळी देखभाल करणे तसेच देवस्थानच्या दानपेटीची व मौल्यवान वस्तुंच्या सुरक्षेची तजवीज करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांमधून होत आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .