कामरगावातील वाढत्या चोऱ्यांबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन; ८ दिवसांत उलगडा न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा.
अहिल्यानगर(हेमंत साठे) दि. १८ जुलै :- मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजे कामरगाव येथे सलग घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १७ जुलैच्या मध्यरात्री ग्रामदैवत श्री कामाक्षा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवीचे अंदाजे अडीच ते तीन तोळे सोन्याचे दागिने व मुकुट चोरी करून मंदिराची विटंबना केली. त्याच रात्री गावातील आणखी दोन ठिकाणी घरफोडी झाली. त्यानंतर दि. १८ जुलैच्या मध्यरात्री पुन्हा शेळ्या व जनावरांची चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या सर्व घटनांचे काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे , कामरगावचे युवा नेते दादा झरेकर, स्वप्नील ठोकळ, अक्षय कोल्हे, सुयोग भुजबळ, संदिप लष्करे व जय आंधळे यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामरगाव परिसरात पोलीस गस्त वाढविण्याचेही आदेश देण्यात आले असल्याची माहिती सिद्धांत आंधळे यांनी दिली.
● या घटनेची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आली आहे, येत्या आठ दिवसांत चोरीचा उलगडा झाला नाही*, *तर कामरगावच्या ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाची परवानगी घेऊन नगर–पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी दिला.
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा