पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

अहिल्यानगर (प्रतिनिधी): राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामरगाव येथील डॉ. सुजयदादा विखे पाटील विचार मंचाच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम कामरगाव इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात पार पडला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कामरगाव तसेच कामरगाव इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी भाजपचे ज्येष्ठ नेते विनायकराव देशमुख हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षण अधिकारी विलास साठे हे होते. सूत्रसंचालन शिक्षिका अमृता गायके यांनी केले.

 कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ आंधळे व मनोज ठोकळ यांनी केले होते.

या कार्यक्रमास,अजिंक्य झेंडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम ठोकळ,प्रगतीशील शेतकरी गोरख साठे, युवाने नेते संदीप लष्करे, मा सरपंच तुकाराम कातोरे, मा.उपसरपंच अनिल आंधळे, मा. चेअरमन शिवाजी साठे, राजेंद्र राजगुरू, अविराज ठाणगे, साहेबराव ठोकळ, बापूसाहेब शेळके, मा.ग्रा.पं.सदस्य हाबू शिंदे व विष्णू कातोरे, चेअरमन रविराज साठे भरत कातोरे, सिकंदर शेख तसेच कामरगाव इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक भारत कांबळे व जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका पदमा मांडगे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार हेमंत साठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .