पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परदेशात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्हयातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी.

इमेज
​अहिल्यानगर (प्रतिनिधी): - मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ​राज्य‌ व जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक : आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे (२४x७) क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत : ​टोल फ्री क्रमांक : १०७० ​फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३ ​ई- मेल : controlroom@gov.in ​तसेच, अहिल्यानगर...

फॉलोअर