पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक कार्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

इमेज
अहिल्यानगर प्रतिनिधी:- सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, वंचित, गरजू अशा विविध घटकांतील नागरिकांना तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सामाजिक कार्याबद्दल अहिल्यानगरच्या लष्करातील सप्लाय डेपो रेजिमेंटतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मेजर रोहित कुमार, सुभेदार मेजर संजयसिंग मलिक, कॅप्टन अंकित यांनी डॉ. उद्धव शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल त्यांचा शाल व पुस्तक देऊन गौरव केला. पाठीवर पडणारी कौतुकाची थाप घडवू शकते इतिहास ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण कायम ऋणी असतो. हे समाजऋण फेडण्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी स्नेहबंधच्या माध्यमातून काम करत आहे. या कार्याबद्दल आज लष्करातील सप्लाय डेपो रेजिमेंटने सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार. प्रोत्साहन माणसाला बळ देतं. योग्य वेळी पाठीवर पडणारी कौतुकाची थाप. येणाऱ्या काळात इतिहास घडवू शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी दिली.

फॉलोअर