सामाजिक कार्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

अहिल्यानगर प्रतिनिधी:- सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, वंचित, गरजू अशा विविध घटकांतील नागरिकांना तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सामाजिक कार्याबद्दल अहिल्यानगरच्या लष्करातील सप्लाय डेपो रेजिमेंटतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मेजर रोहित कुमार, सुभेदार मेजर संजयसिंग मलिक, कॅप्टन अंकित यांनी डॉ. उद्धव शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल त्यांचा शाल व पुस्तक देऊन गौरव केला.

पाठीवर पडणारी कौतुकाची थाप घडवू शकते इतिहास

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण कायम ऋणी असतो. हे समाजऋण फेडण्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी स्नेहबंधच्या माध्यमातून काम करत आहे. या कार्याबद्दल आज लष्करातील सप्लाय डेपो रेजिमेंटने सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार. प्रोत्साहन माणसाला बळ देतं. योग्य वेळी पाठीवर पडणारी कौतुकाची थाप. येणाऱ्या काळात इतिहास घडवू शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.

पैठण ते नारायणडोह कावड यात्रा. नारायणडोह यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा.

अकोळनेर हरिनाम सप्ताहात महिलांचे दागिने चोरणारी टोळी पकडली. पोलीसी हिसका दाखवताच १८ जणांच्या टोळीचा पर्दाफाश.