कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथील शिक्षण विभागातील माजी विस्तार अधिकारी मनसुख  शेख  यांचे चिरंजीव  शाहरुख शेख यांची महिन्द्रा डिफेन्स. मधे प्रबंधक पदावर नियुक्ती झाली. त्यानिमित्त तसेच के एस बी कंपनीत स्टोअर मॅनेजर पदी कार्यरत असणारे अविनाश साठे यांची कन्या ऋतुजा यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनिअर पदावर नियुक्ती झाली. कामरगावच्या  या दोन्ही भूमीपुत्रांचा सत्कार कामरगांव विविध कार्यकारी सोसायटी लि. कामरगांव यांच्या वतीने दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आला . या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक रावजीभाऊ ठोकळ, ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण शेळके , प्रगतीशील शेतकरी गोरख साठे , भाऊसाहेब दळवी , मथुजी झरेकर, प्रा.संभाजी कातोरे सर व बन्सी ठोकळ,  संपत ठोकळ, अंबादास रोहकले व विशाल साठे , बापू थिटे, संतोष साठे व  ग्रामस्थ इ . मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . सदर कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन अनिल आंधळे व व्हा. चेअरमन  श्री. रमेश साठे सर, संचालक तथा मा सरपंच

रावसाहेब साठे , मा चेअरमन शिवाजी साठे, मा. चेअरमन सुनिल चौधरी , मा.व्हा. चेअरमन राजू आंधळे, मा. चेअरमन विष्णू कातोरे, मा.व्हा. चेअरमन राजेंद्र राजगुरु, सुदाम ठोकळ सर, प्रा.डॉ. अशोक ठोकळ सर,  विजय साठे व रावसाहेब पा. आंधळे यांनी केले.

जाहिरात...👇🏻


📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.