कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

जाहिरात...👇🏻

बातमी....👇🏻

अहिल्यानगर (हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगावचे सुपुत्र तथा पोलीस दलात कार्यरत असलेले उपनिरीक्षक अनिल बबन साठे यांचे सुपुत्र साहिल साठे यांनी भारतीय सैन्यदलात (Indian Navy) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (ssc) या परिक्षेत   यश प्राप्त केले आहे. साहिल यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट(कमिशन्ड अधिकारी) म्हणून निवड झाली आहे.

साहिल अनिल साठे यांचे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण मालवणयेथील रोझरी इंग्लिश स्कुल मधे झाले. दहावीच्या परिक्षेत साहिलने 95% गुण मिळवले. भोंसला मिलिटरी स्कुल, नाशिक येथे प्रवेश घेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. बारावी नंतर वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनिअरींग ची (BE) पदवी प्राप्त केली. साहिल हे मालवण येथे सागरी सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे व भरड नाका येथील फॅशन गॅलेक्सी के वस्त्रदालनाचे सर्वेसर्वा शीतल साठे यांचा मुलगा आहे.

        साहिल यांचे आजोबा बबन साठे हे भारतीय सैन्यदलात होते. ते सेवा निवृत्त (माजी) सैनिक असून साहिल यांचे वडील हे भारतीय नौदलातून सेवानिवृत्तीनंतर पोलीस दलात कार्यरत आहेत. तर साहिल यांचे चुलते सुनिल बबन साठे हे देखील सेवा निवृत्त सैनिक आहेत. तसेच साहिल यांचे चुलते नंदकुमार साठे हे देखील भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. सेवानिवृत्ती नंतर ते महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात नायब तहसिलदार पदी कार्यरत आहेत. साहिल साठे हे तीन पीढ्या देशसेवा करणाऱ्या कुटुंबातील असून यापुढे देशसेवेचा वारसा ते भारतीय नौ दलात देशाची सेवा करुन जपणार आहेत. 

         कामररगाव येथे अंदाजे 250 हून अधिक आजी माजी सैनिक असून गावातील प्रथम लेफ्टिनंट ( कमिशन्ड अधिकारी) बनण्याचा मान साहिल साठे यांनी मिळवला आहे.

साहिल साठे यांच्या या यशाबददल सर्वस्तरातुन त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.


📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.