पळवे ग्रामपंचायतची ग्रामसभा ठरली वादळी. ग्रामपंचायत भक्षक की रक्षक...ग्रामस्थांचा आरोप ?
पारनेर (प्रतिनिधी) :- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील पळवे बुद्रुक येथे मंगळवारी (दि. २३) झालेली ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. याबाबत विविध नामांकित वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ग्रामस्थांकडून घेतलेल्या सह्यांचा वापर थेट 'खडी क्रेशर' प्रकल्पासाठी ना हरकत दाखला (NOC) मिळवण्याकरीता करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सभेत उघडकीस आला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवण्यात येत असून, सुमारे ९५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार, माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीत ग्रामपंचायतीने खडी क्रेशर मालकाला दिलेल्या एनओसीसोबत पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी घेतलेल्या सह्यांचे कागदपत्र जोडल्याचे स्पष्ट झाले असल्याचे तसेच. आम्ही आमच्या पिकांच्या नुकसानीसाठी सह्या केल्या होत्या, क्रेशर प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे, अशी संतप्त प्रति...