पळवे ग्रामपंचायतची ग्रामसभा ठरली वादळी. ग्रामपंचायत भक्षक की रक्षक...ग्रामस्थांचा आरोप ?

 

पारनेर (प्रतिनिधी) :-     मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील पळवे बुद्रुक येथे मंगळवारी (दि. २३) झालेली ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. याबाबत विविध नामांकित वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ग्रामस्थांकडून घेतलेल्या सह्यांचा वापर थेट 'खडी क्रेशर' प्रकल्पासाठी ना हरकत दाखला (NOC) मिळवण्याकरीता करण्यात आल्याचा  धक्कादायक प्रकार सभेत उघडकीस आला असल्याची माहिती मिळाली. 

      प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवण्यात येत असून, सुमारे ९५ टक्क्‌यांहून अधिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

प्राप्त माहितीनुसार, माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीत ग्रामपंचायतीने खडी क्रेशर मालकाला दिलेल्या एनओसीसोबत पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी घेतलेल्या सह्यांचे कागदपत्र जोडल्याचे स्पष्ट झाले असल्याचे तसेच. आम्ही आमच्या पिकांच्या नुकसानीसाठी सह्या केल्या होत्या, क्रेशर प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ग्राम सभेत व्यक्त केली. ग्रामस्थांच्या माहितीशिवाय त्यांच्या सह्यांचा चुकीच्या कामासाठी वापर करणे हा फौजदारी गुन्हा ठरतो, अशी चर्चा सभेत झाली.

पर्यावरणीय व प्रशासकीय नियम पायदळी तुडवून ही परवानगी देण्यात आल्याचा आरोप करत ग्रामसभेत झालेल्या मतदानात 95 टक्क्‌‍यांहून अधिक ग्रामस्थांनी खडी क्रेशर प्रकल्प रद्द करण्याची ठाम मागणी केली. दरम्यान, माहिती अधिकारातून समोर आलेल्या कागदपत्रांत मयत व्यक्तींच्या सह्या तसेच ग्रामपंचायतीत कधीही न गेलेल्या महिलांच्या सह्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांना अंधारात ठेवून सह्यांची मोहीम राबवण्यात आल्याचा आरोप होत असून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे. 


ग्रामपंचायत भक्षक की रक्षक ?

ग्रामपंचायतची भूमिका गावासाठी रक्षकाची असते. ग्रामपंचायत ही गावची रक्षक असते, भक्षक नाही. गावातील लोकांच्या विश्वासाशी खेळून हा प्रकल्प केवळ वैयक्तिक फायद्यासाठी लादण्यात येत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सदर एनओसी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामसभेत देण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .