पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कामरगावात सापडले अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे. इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांचे संशोधन .

इमेज
नगर ( हेमंत साठे):- अश्मयुगीन मानव म्हटलं की नजरेसमोर येतं ते इयत्ता तिसरीच पुस्तक ' माणसाची गोष्ट'  हा मानव कसा होता ? काय खात होता? हे या पुस्तकातूनच आपण शिकलो. याचे अस्तित्व दाखवणारी ठिकाणं आपल्या नगर जिल्ह्यात असतील हे आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. अशाच एक अश्मयुगीन ठिकाणाचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक श्री सतीश भिमराव सोनवणे यांनी लावला. हे ठिकाण कामरगाव जवळच्या ' मावलया डोंगरावर' आहे.  कामरगाव नगर तालुक्यातील एक गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे.  यातील  विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नगर पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणाला त्यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली. तेथे डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे.  याचा बारकाईने अभ्यास केला असता ही वेगळीच रचना असल्याचे लक्षात आले. त्यानुसार अभ्यास सुरू केला.  आणखी निरिक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० मार्च २०२४ रोजी  भेट दिली. या व

कामरगाव शिवारात भीषण अपघातात युवक गंभीर जखमी !

इमेज
  नगर – पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात उभ्या असलेल्या मालट्रक वर आदळून नगर शहरातील युवक गंभीर जखमी झाल्याचे समजते. रस्त्यात उभ्या असलेल्या मालट्रक वर दुचाकी जोरात आदळून भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात बंद पडलेल्या डी मॅक कंपनी समोर रविवारी रात्री ८ च्या सुमारास नगरकडे येणारा एक मालट्रक अचानक रस्त्यातच बंद पडला. रात्रीच्या अंधारात या मालट्रकचा अंदाज न आल्याने पुण्याहून नगर कडे मोटारसायकलवर येत असलेला प्रकाश रघुनाथ बडे (वय २३, रा.बोल्हेगाव) याची मोटारसायकल ट्रक ला पाठीमागून जोरात धडकली. त्यामुळे त्याचे डोके ट्रक वर आदळून तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मृत्युंजय दूत म्हणून काम करणारे सिद्धांत आंधळे व त्यांचे सहकारी अमन शेख, नितीन लांडगे, संजय ठोकळ, प्रवीण चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी

फॉलोअर