पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नगर तालुक्यात सोयाबीन चोरणारे चोरटे मुद्देमालासह जेरबंद !* ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई !

इमेज
  नगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर तालुक्यातील साकत येथे शेतकऱ्याच्या  गोठ्यातून सोयाबीन चोरी गेल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधे भीती निर्माण झाली होती. परंतु काही दिवसांतच नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टीमने धडक कारवाई करत सोयाबीन चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी  की,  दिनांक १० ऑक्टोबर २४ रोजी फिर्यादी श्री.सतीश भानुदास कार्ले, वय ४१, रा.साकत, ता.अहिन्यानगर यांचे शेतातील जनावरांच्या गोठयातुन अज्ञात चोरटयांनी २३ सोयाबीनच्या गोण्या चोरी गेल्या होत्या. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ७७०/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला.अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना चोरीचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पो.उपनि अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, राहुल सोळुंके, भाऊसाहेब काळे, अमोल को

स्पर्धांमुळे महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन : मुख्य कार्यकारी अधिकारी - विक्रांत मोरे ; स्नेहबंध फाउंडेशनतर्फे गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण .

इमेज
  (स्नेहबंध फाउंडेशनतर्फे गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, सौ. शिल्पा भंडारी, सचिन पेंडुरकर, निशांत पानसरे.) नगर (प्रतिनिधी): - गौरी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला. यानिमित्त अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाले, असे प्रतिपादन भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.  स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, सौ. शिल्पा भंडारी, सौ. राजश्री शिंदे, साई ट्रॉफीजचे सचिन पेंडूरकर, निशांत पानसरे आदी उपस्थित होते.  मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे म्हणाले, प्रत्येक मातापित्यांनी मुलीला सक्षम बनवा, त्यापुढे जाऊन तिच्या प्रत्येक कार्यामध्ये माहेर आणी सासरकडून तिचे कौतुक करा, आज मुली आणि महिलांना कुटुंबातून प्रतिसाद मिळाला तर निश्चितच यश सं

फॉलोअर