नगर तालुक्यात सोयाबीन चोरणारे चोरटे मुद्देमालासह जेरबंद !* ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई !
नगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर तालुक्यातील साकत येथे शेतकऱ्याच्या गोठ्यातून सोयाबीन चोरी गेल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधे भीती निर्माण झाली होती. परंतु काही दिवसांतच नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या टीमने धडक कारवाई करत सोयाबीन चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १० ऑक्टोबर २४ रोजी फिर्यादी श्री.सतीश भानुदास कार्ले, वय ४१, रा.साकत, ता.अहिन्यानगर यांचे शेतातील जनावरांच्या गोठयातुन अज्ञात चोरटयांनी २३ सोयाबीनच्या गोण्या चोरी गेल्या होत्या. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ७७०/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला.अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना चोरीचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पो.उपनि अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, राहुल सोळुंके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालींदर माने, अरूण मोरे तसेच बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, विजय ठोंबरे, मेघराज कोल्हे नेम.तपास पथक, अहिल्यानगर अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देवून, गुन्हयातील चोरीस गेला माल व आरोपीची माहिती घेत असताना दिनांक 17 ऑक्टोबर रोजी पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे अनानाथ गजानन काळे, रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केला असुन तो दहिगाव ते वाळकी जाणारे रोडने साथीदारासह जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दहीगाव व वाळकी रोडने जाऊन, दोन संशयीत इसमास ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी नाव १) अनानाथ गजानन काळे, वय २२ व २) देवकर गजानन काळे, वय २०, दोन्ही रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
आरोपीकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार ३) अजय गजानन काळे (फरार) ४) देवानंत धर्मेद्र चव्हाण (फरार), ५) नदिम धर्मेद्र चव्हाण (फरार), ६) साईनाथ गजानन काळे (फरार) ७) चिरंजीव भोसले (फरार) व ८) लड्डया चव्हण (फरार) सर्व रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर अशांनी मिळून कार्ले वस्ती, साकत येथील शेत वस्तीवरून २३ सोयाबीनच्या गोण्या चोरून आणल्या होत्या. चोरून आणलेल्या गोण्यापैकी ९ सोयाबीनच्या गोण्या श्रीराम ट्रेडींग कंपनी, रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर व १० सोयाबीनच्या गोण्या सिध्दीविनायक ट्रेडींग कंपनी, वाळकी, ता.अहिल्यानगर यांना विकल्याची माहिती सांगीतली.
तपास पथकाने पंचासमक्ष श्रीराम ट्रेडींग कंपनी, रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर येथुन १९,३५०/- रूपये किंमतीचे ९ सोयाबीनच्या गोण्या व सिध्दीविनायक ट्रेडींग कंपनी, वाळकी, ता.अहिल्यानगर येथून २६८७५ रूपये किंमतीच्या १० सोयाबीनच्या गोण्या असा एकुण ४६२२५/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहिल्यानगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, म संपतराव भोसले. उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा