स्पर्धांमुळे महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन : मुख्य कार्यकारी अधिकारी - विक्रांत मोरे ; स्नेहबंध फाउंडेशनतर्फे गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण .

 

(स्नेहबंध फाउंडेशनतर्फे गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, सौ. शिल्पा भंडारी, सचिन पेंडुरकर, निशांत पानसरे.)

नगर (प्रतिनिधी): - गौरी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला.

यानिमित्त अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाले, असे प्रतिपादन भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले. 

स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. 

याप्रसंगी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, सौ. शिल्पा भंडारी, सौ. राजश्री शिंदे, साई ट्रॉफीजचे सचिन पेंडूरकर, निशांत पानसरे आदी उपस्थित होते. 

मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे म्हणाले, प्रत्येक मातापित्यांनी मुलीला सक्षम बनवा, त्यापुढे जाऊन तिच्या प्रत्येक कार्यामध्ये माहेर आणी सासरकडून तिचे कौतुक करा, आज मुली आणि महिलांना कुटुंबातून प्रतिसाद मिळाला तर निश्चितच यश संपादन करतील. आज महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहबंधची ही संकल्पना  खरोखरच अभिमानास्पद आहे.  

सौ. भंडारी म्हणाल्या, अशा स्पर्धांद्वारे महिलांना प्रोत्साहन मिळते याचा मनस्वी आनंद होतो. आपल्या कार्याचा कोणीतरी गौरव करतो, याचा महिलांनाही अभिमान वाटतो. 

या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या महिलांना पैठणी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन, तर उत्तेजनार्थ दोन महिलांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

{महिलांनी स्वावलंबी बनावे, स्वकर्तृत्वावर उभे राहिले पाहिजे.

आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे व स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिले पाहिजे. यासाठी गेल्या आठ वर्षांपासून या गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या जिल्हास्तरीय गौरी सजावट स्पर्धेत महिला सहभागी झाल्या होत्या. एकूण ३६ व्हिडिओ परीक्षणासाठी आले होते, असे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले.}

 

स्पर्धेचे विजेत्या महिला:-

प्रथम - अश्विनी नितीन नागपुरे, द्वितीय भाग्यश्री मिलिंद कानडे, तृतीय सावित्री सदाशिव गाडेकर, उत्तेजनार्थ संगीता अजित बोराटे, उत्तेजनार्थ महानंदा शरदचंद्र लोटके.


स्नेहबंध फाउंडेशनतर्फे गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी, सौ. शिल्पा भंडारी, सचिन पेंडुरकर, निशांत पानसरे.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !