पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पैठण ते नारायणडोह कावड यात्रा. नारायणडोह यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा.

इमेज
(Advrt) ######################################### नारायणडोह प्रतिनिधी (रफिक शेख):- गुढीपाडव्यानिमित्त शहरी भागात हल्ली शोभायात्रा निघतात मात्र ग्रामीण भागात आजही कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते श्री चांगदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नारायण डोह गावात  तर शेकडो वर्षांपासून गुढीपाडव्याच पैठण धरणातलं पाणी कावडीने आणून देवाला वाहीले जाते. तब्बल 110 किलोमीटरच्या पायी कावड यात्रेचे पथ्यही  कठोर असतात. तळपत्या उन्हात अनवाणी पायांनी या कावडी अवघ्या तीन दिवसात पैठण वरून नारायणडोहला पोहोचतात. या कावड यात्रे दिवशी पोहोचताच ग्रामस्थ त्यांचे यथोचित स्वागत करतात. नंतर गंगाजलाने श्री चांगदेव महाराजांना स्नान घातले जाते.देवाच्या अभिषेकानंतर मंदिरात समोरच गुरुजींकडून सामनिक पंचांग वाचन होऊन पाऊस मानाचा अंदाज वर्तवला जातो.तसेच पाडव्याच्या मुहूर्तावरच साल गाड्यांची बिदाई हि निश्चित होते अशी ही शेकडो वर्षांची परंपरा ग्राम संस्कृती नारायणडोहो गावाने आजही अविरतपणे सुरू ठेवली आहे. भारतीय नववर्षारंभ दिवस म्हणजे चैत्र शु || प्रतिपदा .साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. प्रस्तुत दिवस म्हणजे न...

नि:स्वार्थ सेवाभाव हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र : भास्करगिरी महाराज. डॉ. उद्धव शिंदे यांचा महंत भास्करगिरी महाराजांनी केला सन्मान.

इमेज
(देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी 'स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान केला.) अहिल्यानगर (प्रतिनिधी) - इतरांसाठी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. नि:स्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड चे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराजांकडून सन्मान नेवासा तालुक्यातील देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, ज्येष्ठ नागरिक, आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, आपण आपल्या आचरणात नेहमीच सेवेची भावना ठेवावी, जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल. सेवेची भावनाच हा आपल्यासाठी आत्मसंतोषाचा केवळ वाहक न ठरता, आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेक व्यक्तीमध्ये चांगुलपणा संदेश सदोदित पसरवित असतो आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य करीत असतो. (फोटो ओळ) देवगड संस्...

फॉलोअर