पैठण ते नारायणडोह कावड यात्रा. नारायणडोह यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा.

(Advrt)

#########################################



नारायणडोह प्रतिनिधी (रफिक शेख):- गुढीपाडव्यानिमित्त शहरी भागात हल्ली शोभायात्रा निघतात मात्र ग्रामीण भागात आजही कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते श्री चांगदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नारायण डोह गावात  तर शेकडो वर्षांपासून गुढीपाडव्याच पैठण धरणातलं पाणी कावडीने आणून देवाला वाहीले जाते. तब्बल 110 किलोमीटरच्या पायी कावड यात्रेचे पथ्यही  कठोर असतात. तळपत्या उन्हात अनवाणी पायांनी या कावडी अवघ्या तीन दिवसात पैठण वरून नारायणडोहला पोहोचतात. या कावड यात्रे दिवशी पोहोचताच ग्रामस्थ त्यांचे यथोचित स्वागत करतात. नंतर गंगाजलाने श्री चांगदेव महाराजांना स्नान घातले जाते.देवाच्या अभिषेकानंतर मंदिरात समोरच गुरुजींकडून सामनिक पंचांग वाचन होऊन पाऊस मानाचा अंदाज वर्तवला जातो.तसेच पाडव्याच्या मुहूर्तावरच साल गाड्यांची बिदाई हि निश्चित होते अशी ही शेकडो वर्षांची परंपरा ग्राम संस्कृती नारायणडोहो गावाने आजही अविरतपणे सुरू ठेवली आहे.

भारतीय नववर्षारंभ दिवस म्हणजे चैत्र शु || प्रतिपदा .साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. प्रस्तुत दिवस म्हणजे नववर्षाभिंदन ! अशा हया चांगल्या मुहूर्तावर आपल्यावरील संकट निवारण करण्यासाठी या जागृत दैवताच्या दर्शनाचा लाभ अनेक भक्त घेतात. या दिवसाचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक भक्त या शुभमुहूर्तावर श्री चांगदेव महाराज गंगाजलाचे स्नान घालतात. हे गंगोदक बहुधा पैठण नाथ सागरवरून आणतात. हे गंगोदक आणण्यासाठी लोक एकत्र येऊन समुहाने पायी जातात त्यालाच कावडीने गंगा आणणे असे संबोधतात.

प्रस्तुत परिसरात खूप भक्तगण कावडीला जातात. जाताना सर्वजण एकाच समुहाने  जातात. किंवा प्रत्येकजण आपआपल्या सोयीने समुहात सामील होण्याचा प्रयत्न करतो. जे भक्त कावडीने गंगा आणतात त्यापैकी बहुतेकांच्या कावडी या नवसपुर्तीच्या असतात. काही जन भक्तीभावाने गंगोदक आणण्यासाठी जातात. नारायणडोह गावातून अनेक घरातून अंदाजे कमीत कमी १ व्यक्ती तरी कावडीला जाते. पवित्र गंगोदक हे नाथसागर वरून म्हणजे ” पैठण ” हे अंतर ११० की. मी. असून पायी अनवाणी कावड आणावी लागते. पाणी आणताना कोणत्याही साधनांचा , वाहनाचा वापर करावयाचा नसतो. जर कोणी साधनाचा वापर केला तर त्यास लगेच चमत्कार पहावयास मिळतो.असे सांगितले जाते. यात एक वैशिष्ट्य असे की प्रस्तुत कावड आणण्याच्या कार्यक्रमासाठी ११० की.मी. पायी चालत येवून सुद्धा कुणालाही कसला त्रास होत नाही की रस्त्यात कधी कुणाला अपघात झाल्याचे ऐकले नाही. असे जुन्या जाणत्या मंडळीकडून सांगितले जाते.

पैठण वरून आणलेल्या कावडी गावाच्या बाहेर एका बाजूस थांबतात. सकाळी नऊच्या सुमारास गावातील सर्व लोक कावडी आणण्यासाठी जातात. मिरवणुकीच्या सुरवातीला बँड़ पथक नंतर भगवे ध्वज असलेले वारकरी व त्यांच्या मागे टाळ मृदुंग वीणेच्या तालावर भजनी मंडळी चालत असतात. यात चांगदेव महाराजांची प्रतिमा व भक्तगण असतात. सर्व कावडीवाल्यांच्या पाण्याने देवाला स्नान घातले जाते. सर्व कावडीचे पाणी मूर्तीवर टाकण्यासाठी पूर्ण चौथरा धुवून स्वच्छ केला जातो.गंगोदक मूर्तीवर टाकताना चौथऱ्यावर कुणालाही प्रवेश दिला जात नाही असे हे पवित्र गंगोदक कावडी ने गुढीपाडवा व चांगदेव महाराज यांच्या उत्सवानिमित्त आणले जाते.

२०१० पासून माझ्या वडिलांनी गुढीपाडव्याला पैठण या ठिकाणी कावड आणण्यासाठी मुलांना टेम्पोने मोफत सोडण्यासाठी जातात. तीच प्रथा मी वडिलांपासून सुरु ठेवली आहे.

(कमलेश बाळासाहेब दाणे. टेम्पो चालक नारायणडोह.)

#######################################

मी गेल्या बारा वर्षांपासून कावडी ला जाणाऱ्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी सोय करतो.

(दत्तात्रय बनकर नारायणडोह,)

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

पिंपळगाव कौडा येथे २४० वर्षे जुना शिलालेख. महाशिव रात्रीच्या दिवशी पूर्ण केले वेशीचे बांधकाम.