नि:स्वार्थ सेवाभाव हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र : भास्करगिरी महाराज. डॉ. उद्धव शिंदे यांचा महंत भास्करगिरी महाराजांनी केला सन्मान.
(देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी 'स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान केला.)
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - इतरांसाठी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. नि:स्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड चे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.
गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराजांकडून सन्मान नेवासा तालुक्यातील देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, ज्येष्ठ नागरिक, आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, आपण आपल्या आचरणात नेहमीच सेवेची भावना ठेवावी, जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल. सेवेची भावनाच हा आपल्यासाठी आत्मसंतोषाचा केवळ वाहक न ठरता, आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेक व्यक्तीमध्ये चांगुलपणा संदेश सदोदित पसरवित असतो आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य करीत असतो.
(फोटो ओळ)
देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी 'स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान केला.
खालील लिंकद्वारे आपल्या YouTube न्यूज चॅनलला SUBSCRIBE करा..
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=EgRQu2dcnJtdMx1P
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा