शिक्षक संपावर तरी हिवरे बाजारची शाळा सुरु; पद्मश्री पोपटराव पवार व ग्रामस्थांचा नवा आदर्श.

नगर:- तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार पुन्हा एकदा एका नव्या व आदर्श निर्णयामुळे चर्चेत आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदर्शगाव हिवरेबाजार या गावाने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनामधून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून देत अनेक आदर्श व स्तुत्य उपक्रम राबवून यशस्वी केले आहेत. त्यामुळे आदर्शगाव हिवरे बाजारची किर्ती महाराष्ट्रासोबत देश विदेशातही पसरली आहे. आदर्शगाव हिवरे बाजार हे पुन्हा एकदा आपल्या गावातील आदर्श उपक्रमामुळे चर्चेत आले आहे. सध्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या कर्मचारी संपामुळे शिक्षक संपावर गेले आहेत. हिवरे बाजार येथील शाळा देखील त्याला अपवाद नाही. परंतु शिक्षक संपावर गेले. त्यामुळे गावातील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पद्मश्री पोपटराव पवार व हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी शाळा बंद न ठेवता सुरू ठेऊन विदयार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. हिवरे बाजारच्या जडणघडणी मधे गावातील शिक्षकांचा, त्यातही मराठी शाळेतील शिक्षकांचा मोठा सहभाग आहे. गावातील शिक्षक इतर अनेक बाबींमधे अपवाद ठरलेले आहेत. परंतु आता सुरु असलेल्या संपात त्यांनी सहभागी होणे गरजेचे असल्याने शाळा बंद ठेवण्यात आली असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.अशा वेळी पद्मश्री पोपटराव पवार आणि ग्रामस्थांनी विदयार्थ्यांचा अभ्यास घेत शाळा सुरु ठेवली आहे. कोरोना असताना ही वर्षभर मोठया जबाबदारीने आणि काळजीने ग्रामस्थांनी पद्मश्री पोपटराव पवारांच्या भक्कम साथीने शाळा सुरू ठेवली होती. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून मराठी शाळेतील कोविड बॅच चे २८ विदयार्थी स्कॉलरशिप ला पात्र झाले व ५ विदयार्थी गुणवत्ता यादीत आले. तसेच माध्यमिक मधील १४ विदयार्थी एनएमएमएस परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामुळे यापुढे विदयार्थ्यांचे नुकसान होऊच दयायचे नाही या शब्दाला हिवरे बाजार परिवाराचा संकल्प असल्याचे समजते. शिक्षक संपावर असतानाही विदयार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा बंद न ठेवता स्वतः विदयार्थ्यांचा अभ्यास घेऊन शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे पद्मश्री पोपटराव पवारांचे गाव हिवरे बाजार पुन्हा एकदा महाराष्ट्रात आदर्श व कौतुकाचा विषय ठरत आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !