बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर चालकावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई; पोलीसांशी हातापायी करणाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दाखवला पोलीसी खाक्या..!
अहमदनगर प्रतिनिधी:-
सविस्तर वृत्त असे की कोतवाली पोलिसांच्या हद्दीमध्ये पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. चितळे रोड रस्त्यावर डंपर चालक गणेश नागरे यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केले होते व डंपर मालकाने व चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करून हातापायी केली होती आज रोजी तोच डंपर चालक एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी गौण खनिजाची चोरून वाहतूक करत
लष्कराच्या के. के. रेंज हद्दी मधून गौण खनिज चोरी करून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्याला ढंपर व गौण खनिजासह ८ लाख १० हजार किमतींचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.
सविस्तर हकीगत अशी की शुक्रवारी (दि.२४) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास नगर एमआयडीसी पोलिस
ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे पोलीस पथकासह नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन करत 'असताना या दरम्यान निंबळक चौक ते सनफर्मा जाणारे डांबरी रस्त्यावर सावली हॉटेलपुढे गणेश शेषराव नागरे (रा. गाडगीळ पटांगण, नालेगांव) त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा ढंपर (क्र.एम.एच. १२ ई. एफ. १२६६) मध्ये विनापरवाना ३ ब्रास गौण खनिज मुरुम चोरुन घेऊन विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आला, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पोलिस पथकाने त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सदर मुरूम हा खारे कर्जुने गावाजवळील लष्कराच्या के. के. रेंज हद्दी मधून उत्खनन करून आणला असल्याची माहिती सांगितली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की डंपर चालकाने काही दिवसापूर्वी कोतवाली पोलिसांच्या हद्दीमध्ये दोन पोलीस अमलदाराशी हातापायी केली होती हे लक्षात येताच पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी डंपर चालकाला चांगलाच समाचार घेऊन ताब्यात घेऊन त्याच्यावरती पो.हे.कॉ. संदिप खेंगट यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी गणेश नागरे याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ सह पर्यावरण संरक्षण अधिनीयम १९८६ चे कलम १५,३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गायकवाड, पो.हे.कॉ. संदिप खेंगट, समीर सय्यद यांच्या पथकाने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा