सुप्याच्या महिला सरपंच शाळा सुरू करण्यासाठी सरसावल्या ! पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने घेतला कौतुकास्पद निर्णय.




सुपा :   पारनेर तालुक्यातील सुपा येथील शाळा शिक्षक संपावर गेल्यामुळे बंद आहेत. त्यामुळे विदयार्थ्याचे शैक्षणिक  नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सुप्याच्या महिला सरपंच  मनिषाताई योगेश रोकडे यांनी पुढाकार घेत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत मिटींग  घेऊन गावातील डी.एड. बी.एड. तसेच अनुभवी शिक्षकांना सोबत घेत शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.

          राज्यभर शासकीय कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक देखील बेमुदत संपावर गेले आहेत. परंतु त्यामुळे राज्यभर शाळा बंद आहेत. पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे. सुपा येथील शाळा देखील याला अपवाद नाही. परंतु संपामुळे  गावातील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून सुप्याच्या महिला सरपंच मनिषाताई योगेश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मा. उपसरपंच दत्ता शेठ पवार, उपसरपंच विजय पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, पवारवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाढवणे, कोळेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  गोरख जाधव, कोल्हेवस्ती रोहन जाधव, जांभुळवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर टोणगे , गावठाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री   पवार, यांच्यासह उदयोजक योगेश रोकडे , पप्पूशेठ पवार, कानिफनाथ पोपळघट,अमित भोसले, राहुल पवार, विजय पवार, यांच्यासह, ग्रामपंचायत सदस्य , पदाधिकारी व ग्रामस्थ बैठकीसाठी उपस्थित होते.

         सरपंच मनिषाताई रोकडे  यांनी सांगितले की, विदयार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यात तोडगा निघण्याची चिन्ह नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणात खंड पडल्याने विदयार्थी शिक्षणाच्या प्रवाहा पासून दूर जाण्याची भीती आहे. कोरोना काळानंतर पडलेल्या खंडानंतर आता शाळा सुरू झाल्या परंतु पुन्हा शिक्षकांच्या संपामुळे पुन्हा एकदा विदयार्थी शाळेपासून दुरावले जाऊ लागले आहेत. 

           विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदर्श गाव हिवरे बाजार येथील ग्रामस्थांनी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सोबतीने शाळा सुरू ठेवल्या आहेत. त्याच धर्तीवर सुप्यातील  सहा जिल्हा परिषदेच्या शाळा देखील गावातील डी.एड.बी.एड. पदवीधारक अनुभवी शिक्षकांना सोबत घेऊन सर्व शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच मनिषाताई रोकडे यांनी सांगितले.            

            या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. व शाळेमधे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू राहणार असल्याने सरपंच मनिषाताई रोकडे व सुपा ग्रामपंचायतच्या निर्णयाचे ग्रामस्थांसोबतच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !