दहिगाव श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
नगर प्रतिनिधी:-
नगर तालुक्यातील दहिगाव येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला श्री राम मंदिर देवस्थान या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या यात्रा उत्सव सप्ताह काळात ह.भ.प गणेश महाराज घोडके ,ह.भ.प अशोक महाराज ईलग शास्त्री,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कराळे,ह.भ.रामदास महाराज रक्ताटे,ह.भ.प बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक,ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, ह.भ.प राम महाराज डोंगरे, गोविंद महाराज शिंदे कैलासजी महाराज येवले या प्रमाणे सप्ताह भाव भक्तीने किर्तीन रुपी सेवा दिली.तसेच शुक्रवारी दि.३१ रोजी सकाळी ९ते ११ काल्याचे किर्तीन ह.भ.प. रघुनाथ महाराज (धामणगाव) यांचें होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२२ मार्च ३१ मार्च या कालावधीत सप्ताह संपन्न होत असतो. वीणा सेवा,किर्तीन सेवेनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते.संध्याकाळी महाआरती मान सपत्नीक मान्यवरांना दिला जातो. पाच एकर क्षेत्रावर यात्रा उत्सव भरल्याने बालगोपाल ग्रामस्था मध्ये आनंद उत्साह होता. विविध खेळणं दुकान थाटली असल्याने खरदे साठी गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या श्री राम मंदिर देवस्थान पब्लिक ट्रस्ट वतीने उत्सव आयोजन केले जाते.या ठिकाणी सुविधा उपलब्ध असल्याने भाविक भक्तांची संख्या लक्षणीय आहे.हरीजागर साठी वाळुंज पारग भंजनी मंडळ,शिराढोण भजनी मंडळ,साकत भजनी मंडळ,साकत खुर्द भजनी मंडळ, वाटेफळ भजनी मंडळ, रुईछत्तीसी भजनी मंडळ,तांदळी वडगाव मंडळ, गहिनीनाथ भजनी मंडळ नामस्मरणाची वाहते गंगा सादरकर्ते अनंता दव्रिड व सहकारी, श्री राम भजनी मंडळ या नऊ दिवसांत भक्तिमय वातावरण असते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मंदिर देवस्थान पब्लिक ट्रस्टी व समस्त दहिगावकर पुढाकार घेतात.. ट्रस्ट अध्यक्ष अन्शाबापु म्हस्के, माजी सरपंच मधुकर म्हस्के, सरपंच सुरेखा म्हस्के, माजी सरपंच जयवंत शिंदे, महेश म्हस्के,सुनिल म्हस्के, शिवा म्हस्के संभाजी म्हस्के, सुनिल म्हस्के सर, ह.भ.प आन्हाड महाराज,
अनंता दव्रिड, डॉ.राजु म्हस्के, दत्तात्रय बनकर, निलेश पोटरे, अंकुश शिंदे, उमाकांत देवा, चंद्रशेखर कावरे,नागेश वाघ, सुधीर म्हस्के, नाना गायकवाड, कृष्णा म्हस्के, युवराज म्हस्के, रवी पोटरे, सेवा सोसायटी आजी माजी संचालक मंडळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा