नगर पुणे महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नगर:- तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर कामरगाव सह पिंपळगाव, भोरवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी विविध प्रश्नांसाठी दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि नगर तालुक्यातील कामरगाव , पिंपळगाव कौडा, भोरवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे विविध प्रश्नांचा पाठपुरावा करून देखील कारवाई होत नसल्याच्या निषेर्धात व शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन कारवाई करण्यासाठी नगर पुणे महामार्गावर आंदोलन केले. सदर आंदोलनाची पूर्वसूचना देखील प्रशासनाला देण्यात आली होती. असे समजते.
कामरगाव, पिंपळगाव कौडा, भोरवाडी येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पंचनामे प्रशासनाने केले परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदयापर्यंत भेटली नाही. त्याकरिता महसूल विभाग टोल टोलवीची भूमिका न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे व मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून मांडण्यात आली. तसेच वीज प्रश्नी वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठया मुळे गावामधे वीज कर्मचारी गावपातळीवर राहण्यास असावा. तसेच विजेसंबंधी इतर समस्या मांडण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून विहिरींमधून शेतकऱ्यांच्या मोटार चोऱ्या संबंधी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. व शेतकरी व ग्रामस्थांना न्याय दयावा ही मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी प्रशासनातर्फे महसूल विभागाकडून मंडलाधिकारी टेमक मॅडम व तलाठी हर्षद करपे हे उपस्थित होते. तर महावितरणकडून कार्यकारी अभियंता श्री ढाकणे व वीज कर्मचारी श्री. गायकवाड हे उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासनातर्फे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार शिंदे हे मोठया पोलीस फौज फाट्यासह उपस्थित होते.
या रास्ता रोको आंदोलनात कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे, मा. सरपंच वसंतराव ठोकळ, आजी माजी सैनिक संघटनेचे प्रकाश ठोकळ, मा. उपसरपंच अनिल आंधळे, पिंपळगाव कौडाचे बाळासाहेब शिंदे, भोरवाडीचे योगेश पानसरे , ग्रा.पं. सदस्य संदिप ढवळे, ग्रा.पं. सदस्य हाबू शिंदे, दादा झरेकर, सिद्धार्थ आंधळे, शिवा सोनवणे, प्रशांत साठे इ.सह.मोठया प्रमाणात शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आंदोलनाच्या शेवटी प्रशासना कडून आलेल्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे लेखी निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले.
शशीकुमार देशमुख...
उत्तर द्याहटवा