शहाजापूरच्या कौड्या डोंगरावर होळकर घराण्याच्या कुलदेवतेचा शोध. इतिहास अभ्यासक सतिष सोनवणेंचे ऐतिहासिक संशोधन.


पारनेर:-  तालुक्यातील शहाजापूर ता.पारनेर येथील कौड्या डोंगरावरील राणूबाई देवी होळकर घराण्याची कुल देवता असल्याचे पुरावे इतिहास अभ्यासक सतिष सोनवणे यांनी शोधून काढले आहेत. या ऐतिहासिक व दुर्मिळ संशोधनामुळे भविष्यात इतिहातील अनेक गोष्टींना उजाळा मिळणार आहे . मराठा सरदार महापराक्रमी मल्हारराव होळकरांनी स्थापन केलेल्या होळकर घराण्याच्या अज्ञात कुल देवतेचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक श्री सतीश सोनवणे यांनी लावला आहे. काही दिवसापूर्वी पारनेर तालुक्यातील शहाजापुर गावा जवळील कौडेश्र्वराच्या डोंगरावर गड भ्रमंती चे द्विशतक साजरे करणारे पत्रकार श्री. सुरेंद्र शिंदे सर आणि श्री सतीश सोनवणे यांनी  कौडेश्र्वराला भेट दिली. कौडेश्वराच्या डोंगरावर वालूंबा नदीचे उगम स्थान आहे. त्याजवळ रानुआई चे मंदीर आहे. ही राणू आई म्हणजेच होळकर वंशावळी मध्ये उल्लेख असलेली राजो बाई होय.  इतिहासाचार्य राजवाडे यांनी महेश्वर संस्थांनच्या कागदपत्रा मध्ये होळकर घराण्याच्या दोन वंशावळीचा शोध लावलेला आहे.  त्यातील पहिली जुनी अस्सल वंशावळ अशी -श्री कुलस्वामी देव खंडेराव व महाळसाबाई व बानाबाई, गड जेजुरी, जानोबाई, तळ कोंकण. धरमपुरीं भवानी, तुकाई तुळजापूरची. तिसरी, यमाई कवठ्याची. चौथी, राजोबाई कवड्या डोंगरची.याचा उल्लेख त्यांनी 'श्रीसरस्वती मंदिर ' या द्वै मासिकात लिहीलेल्या ' होळकरांची वंशावळी ' या लेखात केला आहे. श्रीसरस्वतीमंदीर द्वै मासिक अंक 5 वर्ष 2 ज्येष्ठ शके 1827 इसवी सन 1905.



         कौड्या डोंगर हा नगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील शहाजापूर आणि नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा या गावाच्या दरम्यान आहे. स्थानिक लोक या देवीला रानो बाई म्हणतात. डोंगरावर देवीचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरा समोर दीपमाळ आहे. देवीची मुर्ती कमरेवर हात ठेऊन उभी असलेली आहे. राजवाडेनी चुकून     रानो बाई च्याऐवजी राजो बाई लिहिले असावे. या देवी विषयी स्थानिकांना फारशी माहिती नाही. होळकर राज वंशाची कुल देवतेचा शोध लागल्याने एक नवीन माहिती उजेडात आली आहे.

     


    पारनेर तालुक्यातील शहाजापुरचे डोंगर हे तालुक्यातील व जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या खालोखाल सर्वात उंच डोंगर आहेत हे डोंगर अनेक ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार आहेत. या डोगरावर अनेक ठिकाणी कोरीव पाण्याचे टाके आहेत . तसेच इंग्रज कालखंडात येथे इंग्रज सैन्य आराम करण्यासाठी जात होते अशी माहिती अलिकडच्या काळात काही लेखनात आढळून आली आहे तर नगर तालुक्यातील कामरगाव येथील इतिहास अभ्यासक सतिष सोनवणे यांनी पुरातन शोधातून राणुबाई हे होळकर  घराण्याचे दैवत असल्याचे शोधून काढले  आहे . श्री सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी  शहाजापूरच्या कौडेश्वर महादेव मंदिरावरील शिलालेख शोधून त्याच्या अभ्यास केला आहे . मुळात शहाजापुर हे गाव खुप जुने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले आहे.त्याचा इतिहास माहित नसल्याने या जुन्या गोष्टीवर पडदा पडलेला होता .या दुर्मिळ व ऐतिहासिक संशोधनानंतर भविष्यात अनेक गोष्टींना उजाळा मिळण्याची शक्यता आहे.



टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !