आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असा करा !

    


           सध्याच्या काळात अनेक क्षेत्रात म्हणजे शाळेपासून ते बँकेपर्यंत अनेक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. त्यामुळे आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने मोबाइल नंबर लिंक करू शकता.तेही अगदी सहज लिंक करू शकता आधार-मोबाइल नंबर. जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्वरित रजिस्टर करू शकता नंबर.आधार-मोबाइल नंबरला ऑनलाइन देखील लिंक करणे शक्य आहे.सरकारने आधार कार्डला अन्य कागदपत्रं आणि बँक अकाउंटशी जोडणे अनिवार्य केले आहे. आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसल्यास तुम्ही अर्ज करताना मोबाइल नंबर रजिस्टर करू शकता. मोबाइल नंबर लिंक असल्यास आधार कार्डवर डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करणे खूपच सोपे आहे.मोबाइल नंबर लिंक असल्याने अनेक कामे ऑनलाइन करणे शक्य होतात. अनेक शासकिय योजनांचा लाभ घेणे देखील सुलभ होते. जर तुमचा नंबर रजिस्टर नसेल, अथवा बदलला असल्यास तुम्ही सहज नंबर लिंक करू शकता. ऑनलाइन नंबर लिंक करण्यासाठी सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल बंद केले आहे. मात्र, तुम्ही ऑफलाइन पद्धतीने आधार केंद्रांवर जाऊन नंबर अपडेट करू शकतात. तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून आधारशी मोबाइल नंबर कसा अपडेट करू शकता हे जाणून घेऊया.

          आधार कार्डशी मोबाइल नंबर रजिस्टर पुढील पद्धतीने करता येईल:-सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या जवळील आधार केंद्र शोधा. अथवा थेट https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या लिंकवर क्लिक करा.ऑफलाइन नंबर अपडेटसाठी तुम्हाला जवळील आधार केंद्रावर जावे लागेल व तुम्ही त्वरित नंबर अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल.आधार करेक्शन फॉर्म भरा व जो मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे तो द्या.करेक्शन फॉर्म सबमिट करा व Authentication साठी बायोमेट्रिक्स प्रदान करा.त्यानंतर तुम्हाला Update Request Number (URN) असलेली पावती मिळेल. अथवा नंबरवर मेसेज येईल.आधार अपडेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्ही यूआरएनचा वापर करू शकता.मोबाइल नंबर आधारशी लिंक झाल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित डिटेल्स, व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी येण्यास सुरुवात होईल.तुम्ही UIDAI चा टोल-फ्री नंबर १९४७ वर देखील कॉल करून आधार अपडेटची माहिती घेऊ शकता.

आधार – मोबाइल नंबर ऑनलाइन  करा लिंक:-आधार मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या वीआय, एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम ऑपरेटरच्या वेबसाइटवर जा.आधार कार्ड टॅबवरून मोबाइल नंबरला अपटेड/लिंक करण्याच्या पर्यायावर जा. येथे जो नंबर रजिस्टर करायचा आहे तो टाका.नंबर सबमिट केल्यानंतर त्यावर ओटीपी येईल.ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल.त्यानंतर तुम्हाला १२ आकडी आधार नंबर द्यायचा आहे.टेलिकॉम ऑपरेटर ओटीपी जनरेटसाठी एक मेसेज ई-केवायसी डिटेल्सबाबत विचारेल.सर्व नियम व अटी स्विकारू ओटीपी टाका. त्यानंतर आधार आणि फोन नंबर री व्हेरिफिकेशनबाबत एक कन्फर्मेशन मेसेज येईल.तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करून देखील याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता. तसेच, ऑनलाइन पद्धतीपेक्षा तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अगदी सहज आधार-मोबाइल नंबर लिंक करू शकता.

       आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे रोजच्या व्यवहारांमधे पावलोपावली अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु त्वरीत आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक केल्यास अनेक कामे विना अडचण व त्वरीत होण्यास मदत होते.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !