सुसाट वाहने चालवणाऱ्यांना नगर तालुका पोलीसांचा ब्रेक !




नगर -  तालुका पोलीसांनी वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने तसेच नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या ८ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेले आदेशाप्रमाणे नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांनी नगर तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये हाय स्पीडने व भरधाव वेगात वाहने चालवून अपघातात व व्यक्तीगत सुरक्षा तसेच रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या ६ वाहन चालकांवर नगर तालुका पोलिसांच्या विविध पथकांनी सोमवारी व मंगळवारी,आज रोजी २९/३/२०२३ बुधवारी धडक कारवाई करत गुन्हे दाखल करून वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी उपयोजना सुरू केल्या आहेतयाबाबत नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाणाऱ्या महामार्गांवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध पथके स्थापन करुन बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगर-कल्याण रोडवर हॉटेल सुडके पाटील समोर भरधाव वेगात टाटा मॅजिक वाहन चालवणाऱ्या इम्रान नसिम सय्यद (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी गोरख दुसरी कारवाई गोरख माणिक साठे (रा. भाळवणी, ता. पारनेर) या वाहन चालकावरकरण्यात आली. तिसरी कारवाई नगर-जामखेड रोडवर टाकळी काझी शिवारात महिंद्रा जितो वाहनाचा चालक भारत सारंगधर कराड (रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) याच्यावर करण्यात आली. चौथी कारवाई नगर-पाथर्डी रोडवर मेहेकरी शिवारात महिंद्रा बोलेरो जिप चालक नागेश गुलाब खर्से ( रा. कौडगाव, ता. नगर) याच्यावर करण्यात आली.पाचवी कारवाई त्याच ठिकाणी मारुती इको कार चालक शरद प्रभाकर आव्हाड (रा. जांभळी, ता. पाथर्डी) याच्यावर करण्यात आली. सहावी कारवाई मेहेकरी शिवारातच एच.एफ. डिलक्स मोटारसायकल चालक सोमनाथ तुकाराम घुले (रा. बाळेवाडी, ता. नगर) याच्यावर करण्यात आली.7) फिरोज रशीद शेख व 29 धंदा ड्रायव्हर राहणार भातोडी पारगाव ताजी नगर यांनी नगर जामखेड रोड नगर जामखेड शेळके ट्रेडर्स समोर टाकळीकाझी  वेळी व ठिकाणी यातील आरोपीत म // हा त्याचे ताब्यातील इको गाडी नंबर MH 14 HK 5958 ही पुणे कडुन नगरकडे जाणारे रोडने इको गाडी 8) अमरबिन अहमद शेख वय 32 धंदा ड्रायव्हर रा नानेकर वाडी पाण्याची टाकीजवळ चाकण ता खेड जि पुणे यांने नगर पुणे रोड रोड हॉटेल शिवांस समोर असताना चास शिवार

             वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीत म // हा त्याचे ताब्यातील महींन्द्रा जितो गाडी नंबर MH 16 CD 3404 ही नगर जामखेड रोडवर जामखेड कडे जाणारे रोडने महींन्द्रा जितो गाडी मध्ये अॅल्युमिनीयमचे पाईप टाकून वाहतुक करताना मानवी जिवन धोक्यात येईल इतक्या बेफामपणे चालवित घेऊन जात असताना नगर जामखेड, रोडवर 

            या सर्वांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. २७९, ३३६ तसेच मोटारवाहन कायदा कलम १८५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या आदेशाप्रमाणे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार  पोलीस उपनिरीक्षक शेख ,पोलीस उपनिरीक्षक ढवळे , पोकॉ/ जाधव,पोकॉ /बांगर पोकॉ/साठे ,चापोकॉ/गोरे आदींच्या पथकाने सदरची कारवाई केली

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !