सुपा MIDC मधील कंपनीत अपघात होऊन कामगार ठार.

 




पारनेर प्रतिनिधी:- 

         पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मधील एका कंपनीत अपघात  होऊन कंपनीतील कामगार ठार  झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळी घडली आहे. कंपनीमधे झालेल्या अपघातामधे भरत कचरु काळे ( वय 30, रा.अस्तगाव, ता.पारनेर) असे  मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. समजलेल्या माहिती नुसार मंगळवारी सकाळी 10.25 वाजेच्या दरम्यान सुपा एमआयडीसी मधील बाँक्सव्हीया या कंपनी मधे भरत काळे हा तरुण मशिनवर काम करत असताना अचानक तो मशिनमधे अडकला. यावेळी कंपनीतील इतर कामगारांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु मशिन बंद करेपर्यंत भरत काळे हा गंभीर जखमी झाला होता. इतर कामगारांनी जखमी भरत यास सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यावर उपचार होण्यपुर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी नंतर घोषीत केले.

         सदर घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनच्या पीआय गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस घटना स्थळी तसेच  रुग्णालयात जाऊन सदर घटनेची माहिती घेतली. सुपा पोलिसांनी फिर्यादीच्या माहिती वरुन आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास  बी.बी. रेपाळे करत आहेत. सदर दुर्घटनेत मयत पावलेला युवक भरत काळे याची घरची परिस्थिती हलाकीची असून त्याला एक लहान भाऊ आहे व त्याचे आई-वडील मोलमजुरी  करतात. घरातील कर्ता मुलगा गेल्याने अस्तगाव सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !