आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांचे मनोमिलन !




पारनेर (प्रतिनिधी):- पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विदयमान आमदार निलेश लंके हे आगामी पारनेर कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. आतापर्यंत पारनेरमध्ये महाविकास आघाडीचे चित्र हे अस्पष्ट होते. परंतु राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची दिलजमाई झाली असल्याचे समजते.. त्यामुळे आता पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पारनेर मतदार संघातील दोन्ही नेते हे ऐककाळी शिवसेनेत होते. परंतु विधानसभा निवडणुकी अगोदर लंके व औटी यांच्यात राजकीय वाद झाला. त्यामुळे लंके हे राष्ट्रवादीत गेले आणि पारनेर नगर मतदार संघाचे आमदार झाले. त्यानंतरच्या काळात दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सुरु होता. पारनेर नगरपालिकेत तो दिसून आला आहे. परंतु आता पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस, ठाकरे गटाचे औटी, भाजप असे तीन पॅनेल होण्याची शक्यता  होती.  परंतु आता पारनेरमध्ये महाविकास आघाडी घडून आलेली आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राष्ट्रवादीला आठ, काँग्रेसला पाच, ठाकरे गटाला पाच जागा देण्याचे निश्चित झाले असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते.  दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यानंतर माजी आमदार औटी आणि विदयमान आमदार लंके एकत्र आल्याचे बोलले जात आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमधे महाविकास आघाडीचे शेतकरी मंडळ आहे. तर भाजपचे जनसेवा मंडळ आहे. पारनेरमध्ये नगर दक्षिणचे  खासदार सुजय विखे हे वर्चस्व निर्माण करत असल्याची देखील चर्चा आहे. तसेच जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष  सुजीत झावरे पाटील हे भाजपचे पारनेर तालुक्या मधील स्थानिक नेते आहेत. खा.विखेंना पारनेर तालुक्यात रोखण्यासाठी माजी व आजी आमदार  एकत्र आल्याची राजकीय चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक मागील काही दिवसांपूर्वी एकमेंकावर जोरदार टीका करताना दिसून येत होते. त्यामुळे पारनेर तालुक्यात हे दोघे माजी व आजी आमदार  एकत्र येऊ शकत नाही, असे बोलले जात होते. परंतु एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे दोघेही नगर पारनेर मतदार संघाचे आजी माजी आमदार एकत्र आले आहेत, अशी राजकीय चर्चा तालुक्यामधे जोरदार सुरू झालेली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !