कामरगाव येथील कामक्षा माता यात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात !


नगर( प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान कामक्षा माता यात्रोत्सवाची सुरुवात सोमवार  दि २४ एप्रिल रोजी मोठया उत्साहात झाली.

        अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव  येथील कामक्षा माता देवस्थान हे जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान मानले जाते. दि २४ एप्रिल पासून कामक्षा माता यात्रौत्सवाची सुरुवात झाली. यावेळी सालाबाद प्रमाणे कावड आणणाऱ्या  युवकांनी प्रवरा संगम व पैठण  येथून पवित्र जल पायी प्रवास करून आणले. 

त्यानंतर  यात्रेच्या दिवशी सकाळी कावड मिरवणूक गावातून काढण्यात आली. या मिरवणूकीमधे पारंपारीक वादय ढोल, ताशा च्या, तालावर  गावातील ज्येष्ठ मंडळीसह तरुण मंडळीनी लेझीम खेळून पारंपारीक नृत्याचा आनंद घेतला..

तर आधुनिक वादय डिजेचा देखील मिरवणूकीत समावेश होता. डिजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. 

     कामरगाव येथील कामक्षा माता यात्रौत्सवामधे  पारंपारीक व आधुनिक संस्कृतीचा संगम दिसून येतो. कावड मिरवणूकीनंतर युवकांनी पवित्र जल देवीला अर्पण केले. 

यात्रेसाठी गावामधे मोठया प्रमाणात मिठाई खेळण्याच्या दुकानांची रेलचेल असते. यावेळी कामरगाव प्रवेश  द्वारा जवळ गावातील तरुण युवकांनी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी थंड पेय वाटप केले तर आजी माजी सैनिक संघटनेतर्फे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले. कामरगाव यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री छबिना असतो. छबिण्याचे प्रमुख आकर्षण देवीच्या पालखी मिरवणुकीसमोर भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दि २५ एप्रिल रोजी रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे. तसेच दि २५रोजी सायंकाळी ४ वा. दरवर्षी प्रमाणे कुस्ती हगामा भरवला जाणार आहे.कामरगावच्या हगामामधे सामील होण्यासाठी राज्यभरातून पैलवान येतात. दि २६ रोजी हजेऱ्याच्या कार्यक्रमाने  यात्रौत्सवाची सांगता होणार आहे.

        कामरगाव येथील यात्रौत्सवामधे सामील होण्यासाठी पुणे, मुंबई, नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून देवीचे भाविक येतात. जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी या यात्रौत्सवामधे सामील होण्याचे  आवाहन कामक्षा माता मंदिर ट्रस्ट, यात्रौत्सव कमिटीने केले आहे. तसेच आजी माजी सैनिक संघटना, सर्व ग्रामपंचायत आणि सोसायटी आजी माजी सदस्य, व  कामरगाव ग्रामस्थांनी  कामक्षा माता यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे.


📲 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !