नगर कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान अपडेटस् !
नगर :- तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान शुक्रवार सकाळी आठ वाजेपासून सुरु झाले. यामधे सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, हमाल मापाडी मतदार संघ सकाळच्या सत्रातील ११.३० वाजेपर्यंत मतदान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान आज शुक्रवारी सकाळी आठ वाजे पासून सुरु झाले असून. पावसाने हजेरी लावल्यामुळे काही वेळ अडसर आला. परंतु त्यानंतर सुरळीत प्रक्रिया सुरू झाली. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सोसायटी मतदार संघात ३५ टक्के , ग्रामपंचायत मतदार संघात २५ टक्के तर हमाल मापाडी मतदार संघात १० टक्के मतदान झाले आहे.
तसेच भाजपची मतदारांना घेऊन येणारी बस थेट मतदान केंद्रावर आल्याने भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आले.दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन कार्यकर्त्यांमधे बाचाबाची झाली. परंतु तात्काळ पोलीसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. नगर कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान सकाळच्या सत्रात झालेल्या मतदाना पेक्षा दुपार नंतर मोठया प्रमाणात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा