नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भाऊसाहेब बोठे तर उपसभापती पदी रभाजी सुळ यांची निवड !

 


नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे व उपसभापती पदी पिंपरी घुमट गावचे सरपंच रभाजी सुळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदा कोणाची व वर्णी लागणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. यावेळी वाळकी गटावर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांनी विश्वास दाखवला असून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाऊसाहेब बोठे तर उपसभापतीपदी पिंपरी घुमट गावचे सरपंच रभाजी सुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.



*शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन,नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र जबाबदारी पेलणार असल्याचे सभापती व उपसभापती यांनी सांगितले...

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .