शिराढोण शिवारात चार वाहनांचा विचित्र अपघात.
नगर प्रतिनिधी -नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक ५१६अ चे संथ कामाच्या दिरंगाई मुळें दररोज किरकोळ अपघात होत आहेत.पंरतु आज शिराढोण पेट्रोल पंप जवळील किनार हाँटेल नजदीक रस्ता काम चालू आहे.नगरच्या दिशेने दोन वाहन दोन वाहने रुईछत्तीसी दिशेने फलक दररोज आदल बदल लक्षात न आल्याने दोन वाहने एका दिशेने दुसरे वाहनं विरुद्ध दिशेने आल्याने यात बचाव करण्यासाठी दिशेत बदल केल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी नागरिक म्हणे होते.महामंडळ बस क्रमांक एम एच बीटी १३८७,एक आयशर क्रमांक एम एच १६ एम २८२३,टेम्पो,पिक अप, एक दुचाकी क्रमांक एम एच १६ बी आर, ०४०८
या ठिकाणी दिशादर्शक फलक बदल व वाहतूक व्यवस्था अयोग्य नियोजन मुळें रस्ता निर्देशक फलक योग्य वापर न केल्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात चार व्यक्ती गंभीर जखमी झाले. या जखमी नागरिकांना मदतीला शिराढोण गावातील व शेतकरी व प्रवासी मदतीला धावून आले परंतु आपत्कालीन व्यवस्थापन १०८ रूग्णवाहिका घटनास्थळी तब्बल पाऊण तास उशिरा आल्याने अपघात व्यक्तीना रुग्णालयात नेण्यासाठी मोठा वेळ प्रतिक्षा करावी लागली.१०८ रुग्णवाहिका कमीत कमी १८ मिनिटांच्या आसपास घटनास्थळी पोहचण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाचे गाईडने लाइन आहेत. अलिकडच्या काळात आपत्कालीन व्यवस्थापन १०८ नगर सोलापूर रस्त्यावर वेळेत पोहचण्याचे नियोजन नसल्याचे समोर येत आहे.
या ठिकाणी अनेक नागरिकांनी आपल्या पध्दतीने मदत साठी प्रयत्न करत होते वाहतूक कोंडी झाल्याने रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी अडथळा येत होता नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कामाच्या दिरंगाई मुळें अपघात संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या गोष्टी कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिक व प्रवासी मागणी करत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा