नगरमधे ४ बोगस अग्निवीरांना अटक !


अहमदनगर – अग्नि वीर म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी बनावट कॉल लेटर दाखवून नगरमधील प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या चार बोगस अग्निवीरांना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पकडून त्यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समजलेल्या माहितीनुसार भारतीय  सैन्य दलात अग्निवीर म्हणून भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर घेवून नगरमधील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या चौघा बोगस अग्निवीरांना लष्कराच्या अधिकार्‍यांनी पकडले असून. या चौघांसह त्यांना बनावट कॉल लेटर तयार करुन देणारे दोघे अशा ६ जणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लष्कराचे अधिकारी सुभेदार शिवाजी Sunday काळे (आयटी बटालियन एम आयसी अ‍ॅण्ड एस, सोलापूर रोड, नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून. यामधे म्हटले आहे की, आमच्या बटालियनमध्ये देशभरात अग्निवीर म्हणून भरती झालेले युवक प्रशिक्षणासाठी येत असतात. त्यानुसार मंगळवारी (दि.२३ मे) रात्री १० वाजण्याच्या सुमारास उत्तरप्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आदर्श नांगेलाल कुशावह (वय १९), मोहितकुमार माणिकलाल यादव (वय २५), आनंद शाम नारायण शर्मा (वय २३), अंशु राजेंद्रकुमार पटेल (वय २०) हे चौघेजण त्यांच्या नावाचे कॉललेटर घेवून एमआयसी अ‍ॅण्ड एस सोलापूर रोड दरेवाडीचे गेट नं.३ वर आले.त्यांची कागदपत्रे बटालियनचे आर.पी. हवालदार तलविंदरसिंह यांनी तपासले असता त्यांच्या कॉललेटरवर कर्नल विजयसिंह (ए.आर.ओ. मेरठ) असे नाव असून त्यावर सही होती. मात्र एआरओ सेंटरचा शिक्का नव्हता. त्यामुळे हवालदार तलविंदरसिंह यांना शंका आली व त्यांनी बटालियनचे सुभेदार मेजर सत्यवीर सिंह, मेजर राजपुत यांना या चारही मुलांचे कॉललेटर बनावट असल्याच रिपोर्ट दिला. त्यानंतर चौघांना बुधवारी (दि.२४) सकाळी ८.३० वाजता आयटी बटालियनचे मेजर संजया बिष्णोई यांच्या कार्यालयात चौघांना हजर करण्यात आले. उत्तरप्रदेशातील मेरठचे एआरओ यांच्याकडे या ४ जणांच्या भरतीबाबत चौकशी केली असता तेथे या नावाचे कोणीही भरती झाले नसल्याचे आढळून आले. तसेच अग्नीवीरमध्ये भरती झालेल्या मुलांची माहिती असलेल्या आसान अ‍ॅपवर तपासणी केली असता तेथेही त्यांची नावे आढळून आली नाहीत.त्यामुळे सदर कॉललेटर बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यावर लष्करी अधिकार्‍यांनी त्या चौघांकडे हे कॉललेटर कोणी तयार करुन दिले याची चौकशी केली. त्यावेळी सदर कॉललेटर लोकेशकुमार तेजपालसिंग राजपूत व गोपाल रामकिशन चौधरी (दोघे रा.उत्तर प्रदेश) यांनी आम्हाला बनवून दिलेले असून ते दोघे नगरमध्ये असल्याची माहिती लष्करी अधिकार्‍यांना दिली.

या चार तरुणांनी तसेच त्यांना बनावट कॉललेटर बनवून देणार्‍या दोघांनी खोटी कागदपत्रे तयार करुन लष्कराची फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध सुभेदार शिवाजी काळे यांच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिसांनी भा.दं.वि.क. ४२०, ४६८, १७७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील चौघा बोगस अग्निवीरांना लष्करी अधिकाऱ्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. तर बनावट कॉल लेटर बनवून देणाऱ्यांना पोलिसांनी नगर शहरातून अटक केली आहे. या ६ आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

या प्रकरणातील बोगस अग्निवीरांना भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर हे लोकेशकुमार तेजपालसिंग राजपूत याने दिले होते. तो लष्करी जवान नसतानाही लष्करी अधिकाऱ्यांचा गणवेश घालून आपण लष्करातील अधिकारी असल्याचे सांगत होता. तर त्याला गोपाल रामकिशन चौधरी हा सहाय्य करत होता. या दोघांनी त्या चौघाजणांकडून लष्करात नोकरीला लावण्यासाठी तब्बल ७ लाख ५० हजार रुपये घेतले असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चार बोगस अग्नि वीर त्यांना बनावट लेटर तयार करुन देणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !