फरार असलेला अट्टल गुन्हेगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद !


नगर ( प्रतिनिधी) :- दिनांक 20/02/2023 रोजी फिर्यादी यांचा चुलत भाऊ याने फिर्यादी यांचे घरात अनाधिकृत पणे प्रवेश करून पैसे मागीतले असता त्यावर फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपी नामे अभिलेख धर्मेंद्र वाघेला रा. नेहरू कॉलनी, भिंगार ता. जि. अहमदनगर याने फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादी यांचे घरातील टेबल वर ठेवलेल्या पर्समधील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतले व तु जर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली तर पाहून घेईल अशी धमकी दिले बाबत कॅम्प पो स्टे गु र नं 117/2023 भादवि कलम 452,324,504,506 प्रमाणे दि. 21/02/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडले दिनांकापासून सदरचा आरोपी हा फरार होता. तसेच सदर आरोपी विरूद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं 117/2023 भा द वि कलम 364, 365,452,323, 504,503,34 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात सुद्धा आरोपी नामे अभिलेख धर्मेद्र वाघेला गुन्हा घडले दिनांकापासून फरार होता... दि. 25/05/2023 रोजी कॅम्प पो स्टे चे सपोनि. श्री. दिनकर मुंडे सो यांना गोपनिय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली कि फरार


आरोपी नामे अभिलेख धर्मेंद्र वाघेला हा पंचशील नगर, नगर पाथर्डी रोड परीसरात आलेला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सपोनी श्री. दिनकर मुंडे सो यांना लागलीच पोसई / मंगेश बेंडकोळी, पोहेकॉ / संदिप घोडके, पोहेका / रेवननाथ दहीफळे, पोहेकॉ / बापुसाहेब

म्हस्के, पोना/ राहुल द्वारके, पोना/दिलीप शिंदे, पोकाँ/अमोल आव्हाड अशांना बातमीतील हकीकत सांगून पंचशील नगर नगर पाथर्डी रोड

परीसरात सापळा लावला असता तेथे अभिलेख धर्मेद्र वाघेला वय 30 वर्षे रा. नेहरू कॉलनी, भिंगार ता. जि. अहमदनगर हा उभा असलेला दिसला त्यास वरील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर करून मा.न्यायालयात हजर केले असता आरोपी म// यास मा. न्यायालयाने 01 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असून पुढील ताबा कोतवाली पोलीस स्टेशन यांनी घेतला आहे. सदर गुन्ह्यातील अभिलेख धर्मेद्र वाघेला वय 30 वर्षे रा. नेहरू कॉलनी, भिंगार ता. जि. अहमदनगर याचेवर यापुर्वी खालील

प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) कॅम्प पो स्टे गु र नं 39/2010 भा द वि कलम 457,380 प्रमाणे

2) कॅम्प पो स्टे गु र नं 63/2010 भादवि कलम 457,380 प्रमाणे

3) कॅम्प पो स्टे गु र नं 65/2010 भादवि कलम 457,380 प्रमाणे 4) कॅम्प पो स्टे गु र नं 65/2011 भादवि कलम 379 प्रमाणे

5) कॅम्प पो स्टे गुर नं 113/2011 भादवि कलम 379,34 प्रमाणे

6) कोतवाली पो स्टे गु र नं 165/2015 भा द वि कलम 324,323, 504, 506 प्रमाणे

7) कॅम्प पो स्टे गु र नं 25/2017 भादवि कलम 394,323, 504, 506 प्रमाणे

(8) कॅम्प पो स्टे गु र नं 26/2017भा द वि कलम 309,189 प्रमाणे

9) कॅम्प पो स्टे गु र नं 125/2018 भादवि कलम 306,34 प्रमाणे 10) कॅम्प पो स्टे गुर नं 362/2018 भादवि कलम 354,323,504 प्रमाणे

11) कॅम्प पो स्टे गु र नं 245/2018 भा द वि कलम 326,325,323 प्रमाणे 12) कॅम्प पो स्टे गु र नं 302/2018 भा द वि कलम 354,323,504 प्रमाणे

13) कॅम्प पो स्टे गु र नं 148/2021 भा द वि कलम 326,324,323 प्रमाणे 14) कॅम्प पो स्टे गुर नं 226/2022 भादवि कलम 307,504,506 प्रमाणे

15) कोतवाली पो स्टे गु र जि. नं 117/2022 भा द वि कलम 364,365, 452, 323, 504,503, 34 प्रमाणे 16) कॅम्प पो स्टे गुर नं 117/2023 भा द वि कलम 452,324,504,506 प्रमाणे

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खेरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे, सहा. पोलिस निरीक्षक श्री. दिनकर मुंडे, पोसई मंगेश बेंडकोळी, पोहेकॉ / संदिप घोडके, पोहेकॉ /रेवननाथ दहीफळे, पोहेकाँ/बापुसाहेब म्हस्के, पोना/राहुल द्वारके, पोना/दिलीप शिंदे, पोकों/अमोल आव्हाड यांनी सदरची कारवाई केली आहे.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !