नगर शहरातील रेल्वे पुलावर भीषण अपघात.

 

नगर ( प्रतिनिधी):- शहरातील नगर पुणे महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माती वाहतुक करणारा ढंपर कठडे तोडून पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात घडला आहे.

       समजलेल्या माहिती नुसार, शहरातील नगर पुणे महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलाचे कठडे तोडून पांढऱ्या रंगाचा मातीने भरलेला ढंपर पुलावरून खाली कोसळला आहे. प्रथम दर्शनी ढंपर चालकाचे ढंपर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजते. रेल्वे पुलाच्या कठड्यामधे ढंपर अधांतरी अडकल्यानंतर ड्रायवर ढंपर मधून बाहेर पडून जखमी झाल्याचे समजते. तसेच अपघात ग्रस्त ढंपरमधून ऑईल सोबत रक्तदेखील मोठया प्रमाणात बाहेर येत होते. त्यामुळे अन्य कुणी अडकलय का ?  याचा शोध घेतला जात होता. परंतु ढंपर रेल्वे पुलावर  अधांतरी अडकल्यामुळे  प्रत्यक्ष दर्शी उपस्थित जमावाला शोधण्यात अडचण येत होती. त्यातच ढंपरच्या इंजिन मधून अचानक धूर निघू लागल्याने देखील बचाव करताना लोकांना अडचण येत असल्याचे समजते.


           मातीने भरलेला ढंपर अचानक रेल्वे पुलाचे कठडे तोडून कोसळल्याने धुळीचा लोळ उठला होता. रेल्वे पुलावरील रस्ता अरुंद असल्याने अपघात पाहण्यासाठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूने त्या परिसरात ट्रॅफिक जॅम होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !